
कोल्हापूर : भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचा पडसाद म्हणून मंगळवारी दुपारी शहरात विविध ठिकाणी आंदोलने, करण्यात आले. यामध्ये आंदोलकांनी बिंदू चौक, दसरा चौक, कावळा नाका आदी ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको केले. त्यानंतर सायंकाळी टाऊन हॉल येथे झालेल्या बैठकीत बुधवार (दि. ३) रोजी कोल्हापूर बंद करण्याचा निर्णय विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
भीमा कोरेगांव येथे झालेल्या घटनेचे पडसाद आज सकाळी कोल्हापुरातही घडले सकाळी दहाच्या सुमारास विचारे माळ परीसरातील काही कार्यकर्त्यांनी कावळा नाका येथील वाहतूक रोखली आणि आंदोलनाला सुरवात झाली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून संदेशाची देवाणघेवाण करून कार्यकर्ते बिंदू चौकात जमा झाले. दरम्यान शहरात तोडफोड झाल्याच्या अफवा पसरल्याने पोलीसांनी बिंदू चौकात बंदोबस्त तैनात केला. कार्यकर्त्यांनी बिंदू चौकात जमून जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी बिंदू चौकातील रस्त्यावर ठिय्या मारला. जवळपास आर्धा तास वाहतुक ठप्प झाली. पोलीसांनी वाहतूक अन्य मार्गाने वळविली. तोवर कार्यकर्त्यांनी टायर पेटवल्याने तणाव वाढला. पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण जास्तच तापले. दरम्यान आर.पी.आय. आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आणि त्या नंतर पश्चीम महाराष्ट अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे आंदोलन स्थळी दाखल झाले. त्यांनी भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविला. त्यानंतर आंदोलनाबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी टाउन हॉल बागेत तात्काळ बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे शिवाजी रोड जाण्यासाठी निघाले. मात्र वाटेतच काही तरूणांनी दुकांनावर दगडफेक केली. त्यांना पोलीसांनी तात्काळ रोखले. त्याचवेळी रिपब्लिकन पार्टीतर्फे दसरा चौकात निदर्शने करण्यात आली.त्यानंतर आंबेडकरी विचारांच्या सर्व पक्ष,संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक टाऊन हॉल येथे झाली. या बैठकीत उद्या बुधवार दि. ३ रोजी कोल्हापूर बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बंद मध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नये.
Leave a Reply