
कोल्हापूर : भीमा कोरेगाव घटनेच्या तीव्र निषेधार्थ काल आंबेडकर वादी संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर मध्ये बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.पण बंदला हिंसक वळण लागले. संभाजी नगर चौक,शिवाजी पूल येथे रास्ता रोको करण्यात आला.के एम टी बस, वाहनांची तोडफोड करण्यात आली.पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दंगल पथकाला दसरा चौकात पाचारण करण्यात आले आहे. तरुण भारत च्या कार्यलवार जमावाने दगडफेक केली.
Leave a Reply