उद्या बंद तात्पुरता मागे ; दंगलीमागे मोठे षड्यंत्र समाज बांधवानी शांतता राखावी : आमदार क्षीरसागर यांचे आवाहन

 

कोल्हापूर : भीमा कोरेगांव येथील घटनेचे समर्थन करू शकत नाही. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील समस्त दलित संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला कोल्हापूर शहरातील समस्त व्यापारी वर्गाने प्रतिसाद दिला, पण काही समाजकंटकानी शहरामध्ये दहशत माजवत हजारो गाड्या फोडल्या, बँक, वृत्तपत्रांचे कार्यालये यांवर दगडफेक करून अतोनात नुकसान केले आहे, या घटनेचा मी निषेध करीत आहे. या दंगलीमागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता असून, सर्व समाज बांधवांनी शांतता राखावी, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोर्चा निघणार असताना त्या अनुषंगाने प्रशासनाने कोणतीच उपाययोजना केली नाही. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेणे गरजेचे होते. पण प्रशासनाचा निष्काळजीपणामुळे सदर घटना घडली आहे. यामध्ये जबाबदार असणाऱ्या आणि जनतेचे सरंक्षण करू न शकणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे गरजेचे असून, शहरासह जिल्ह्यातील सर्व तमाम समाज बांधवांनी कोणत्याही अवफांवर विश्वास न ठेवता शहरात शांतता राखावी. घडलेली घटना निंदनीय असून, शहरातील सर्व व्यवहार सुरळीत राहण्याकरिता, जनसामान्यांना कोणताही त्रास होऊ नये याकरिता हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या पुकारलेला बंद तात्पुरता मागे घेतला आहे. यासह शहरातील नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहनही आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!