
मुंबई प्रतिनिधी : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटाला अखेर प्रदर्शनासाठी मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय चित्रपट निरीक्षण मंडळाने काही बदल करण्याचे सुचवून संजय लीला भन्साळी यांना चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आहे.
चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावती’ ऐवजी ‘पद्मावत’ ठेवावे, चित्रपटातील सर्व घटना या काल्पनिक असून याचा वास्तविकतेशी कोणताही संबंध नाही, सतीच्या परंपरेचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही असे डिस्क्लेमर द्यावे, घुमर गाण्यातही बदल करावा, असे बदल केल्यास चित्रपटाला प्रदर्शनाला परवानगी मिळू शकते, असे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी सांगितले.
Leave a Reply