भीमा-कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र बंद मागे : प्रकाश आंबेडकर

 

भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा निषेध म्हणून पुकारलेला महाराष्ट्र बंद आज भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मागे घेतला. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकरांनी बंद मागे घेण्याची अधिकृत घोषणा केली.बंद शांततेत पार पडल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील 50 टक्के जनता आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होती. देशातील काही हिंदू संघटना देशात गोंधळ निर्माण करण्यासाठीच आहेत. काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. शिवाय, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे दोघेजण भीमा-कोरेगाव हिंसाराचाराचे मुख्य सूत्रधार असल्याचा पुनरुच्चारही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!