
कोल्हापूर : रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनियमित आणि आरोग्याला हानिकारक अशी झाली आहे. यामुळे अनेक जटील गुंतागुंतीच्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापैकी एक असे यकृत आणि त्या संबंधातील आजाराविषयी फारशी माहिती नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. म्हणूनच या बाबतीत जनजागृती व्हावी यासाठी ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे हिपॅटोलॉजिस्ट डॉ. पारिजात गुप्ते, यकृतरोपण तज्ञ डॉ. संजय वाळके यांनी आज हॉटेल पर्ल येथे sccm आणि api च्या डॉक्टरांच्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच अंतरंग हॉस्पिटल येथे सकाळी १२ ते ४ दरम्यान रुग्णांची तपासणी केली.
प्रत्यारोपणद्वारे लिव्हरकन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो तसेच यकृताचे आजार पसरत आहेत. अतिमद्यसेवन, दीर्घकाळ मद्यसेवन यामुळे आजार जास्त उद्भवतात. या आजारांची लक्षणे समजून येत नसल्याने थकवा जाणवणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, पायाला सूज येणे, रक्ताची उलटी होणे अशी काही लक्षणे आढळल्यास तात्काळ रूग्णालयात जावे असे सांगत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी अंतरंग हॉस्पीटल येथे रुग्ण तपासणी साठी तज्ञ डॉक्टर उपलब्ध असणार आहेत तरी याचाही लाभ घ्यावा असे आवाहन शल्यविशारद डॉक्टरानी यावेळी केले.
Leave a Reply