कोल्हापूर प्रतिनिधी :भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत त्यातून राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ९ व १० जानेवारीचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलला आहे.अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून देण्यात आली.
शरद पवार यांच्या दौऱ्यावेळी निश्चित केलेल्या राजर्षी शाहू शतक महोत्सवी वर्षाची सांगता व शाहू समाधी लोकार्पण सोहळा हे कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहेत. शरद पवार या दौऱ्यावेळी आपल्या मामाच्या बोलीवाडे तालुका पन्हाळा या गावी जाणार होते असे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
Leave a Reply