
कोल्हापूर : कोल्हापूरला कलेचे वारसा आहेच पण चित्रपट निर्मितीची पायामुळ इथेच रोवली गेली. आज बॉलीवूड, टॉलीवूड, आले पण शंभर वर्षापूर्वी १९१७ साली बाबुराव पेंटर यांनी कोल्हापुरात चित्रपट निर्मिती सुरु केली. कोल्हापूरच्या मातीन अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ घडवले. त्यामुळे आज जगाच्या नकाशावर कोल्हापूरचे नाव अभिमानाने घेतले जाते. आज मराठी चित्रपटाला जागितक दर्जा आहेच. पण मधल्या काळात कोल्हापूर म्हणजे रांगडेपणा ग्रामीण बाज एवढ्यापुरताच मराठी चित्रपट मर्यादित राहिला. पण हि समजूत मोडीत काढत कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या एका तरुण दिग्दर्शकाची निर्मिती हि तरुणाईला रुचेल, पटेल अशा नव्या दमाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. कोल्हापूर म्हणून कॉलिवूड या मुव्हमेंटची सुरुवात २०१२ साली दिग्दर्शक उमेश दिवेकर यांनी केली. याचा पहिला टप्पा म्हणून ‘सोचू तुम्हे’ची निर्मिती केली. हा चित्रपट येत्या मी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
खास कोल्हापूर मेड असलेल्या या चित्रपटात ९० च्या दशकातील काळ दाखविण्यात आला आहे. याचे शुटींग गोवा येथे झाले असून १० हिंदी भाषेतील गाणी यात आहेत. जेणेकरून मराठी चित्रपट महाराष्ट्रापुरता मर्यादित राहू नये. संगीत व निर्मिती शैलेश फळदेसाई यांची असून चित्रपटातील गाणी शान, साधना सरगम, राहुल सक्सेना, राजेंद दीक्षित, मिलिंद इंगळे प्रख्यात गायकांनी गायली आहेत.
चित्रपटात शक्ती इंगळे, ॠचिका कोरगावकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. असिस्टंट डीरेक्टर म्हणून दयानंद येवतीकर, एडिटिंग तौफिक जमादार, केमेंरा आसिफ नाईक, आर्ट डीरेक्टर विशाल जाधव, तंत्र सहाय्य विजय पोवार यांचे आहे. ९० च्या दशकातील फील येणारा कोल्हापूरच्या मातीतला चित्रपट असूनही हिंदीला तोडीस तोड नवीन धाटणीने निर्मिती केलेला हा चित्रपट पेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास ‘सोचू तुम्हे’च्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.
Leave a Reply