
कोल्हापूर : मित्रांच्यासाठी काहीही करायला तयार असणारे मित्र आपण अनेकदा पहिले आहेत. असेच मित्रांच्या नात्यातील एक पैलू दर्शवणारा ‘ओढ’ १९ जानेवारीला सर्वांच्या भेटीला येत आहे. सोनाली एन्टरटेंन्मेट हाउसची प्रस्तुती असून निर्मिती एस आर तोवर यांनी केली आहे. दिग्दर्शन नागेश दरक यांनी केले आहे.
गणेश आणि दिव्या यांच्या मैत्रीतील भावविश्व, त्यांची ओढाताण आणि एका घटनेनंतर येणारे वळण अशी कथा आहे. मोहन जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, राहुल चीटनाळे, आदित्य आळणे, सचिन चौंबे, शीतल गायाकवाड, तेजस्विनी खताळ, मृणाल कुलकर्णी, आदी कलाकारांच्या सोबत गणेश तोवर आणि उल्का गुप्ता हि नवी जोडी या चित्रपटातून समोर येत आहे. चित्रपटात ४ वेगवेगळ्या जॉनरची गाणी असून आदर्श शिंदे, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल, रोहित राऊत, आनंदी जोशी व जावेद आली आदींनी गाणी गायली आहेत. कथा व पटकथा दिनेश सिंग ठाकूर यांनी लिहिली असून कलादिग्दर्शक आरिफ खान यांनी केले आहे.
Leave a Reply