13 आणि 14 जानेवारी रोजी रंगणार भिमा फेस्टिव्हल

 

कोल्हापुरच्या रसिकांना मिळणार सांस्कृतिक मेजवानी

कलानगरी कोल्हापूरचं हक्काचं व्यासपीठ असणार्‍या चॅनल बी च्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारा भिमा फेस्टिव्हल म्हणजे कलापूरचं प्रसिध्द व्यासपीठ आहे. चॅनल बी च्या वर्धापन दिनानिमित्त राजर्षि छत्रपती शाहू खासबाग मैदान इथं13 आणि 14 जानेवारी 2018 रोजी भिमा फेस्टिव्हल साजरा होणार आहे. त्यातून कोल्हापुरच्या रसिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे.

शनिवार दि. 13 जानेवारीला झी टॉकीज आणि झी युवा प्रस्तुत हृदयात वाजे समथींग, हा गीत-संगीत- नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर होईल. वैभव तत्ववादी, मृण्मयी देशपांडे, आदर्श शिंदे, नम्रता सुतार, माधवी निमकर,संस्कृती बालगुडे, प्रियदर्शन जाधव, समीर चौगुले, सुहास परांजपे, मिरा जोशी, आरती सोळंकी, नम्रता आवटे यांच्यासह मराठी चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील अनेक प्रसिध्द कलाकार 13 जानेवारीला भिमा फेस्टिव्हलच्या व्यासपीठावर कलाविष्कार सादर करतील. हा कार्यक्रम चॅनल बी सह झी टॉकीज आणि झी युवा या दोन्ही चॅनलवरून प्रसारीत होणार आहे. तर14 जानेवारी रोजी मराठी चित्रपट सृष्टीचा गेल्या शंभर वर्षाचा इतिहास उलगडून दाखवणारा प्रभात ते सैराट हा कार्यक्रम सादर होईल. मिलींद ओक यांची संकल्पना आणि दिग्दर्शन, राहूल सोलापूरकर यांचं निवेदन तर चैतन्य कुलकर्णी, जितेंद्र अभ्यंकर, स्वरदा गोडबोले,दिपीका दात्तार असे गायक असणार आहेत. दृकश्राव्य स्वरूपातील प्रभात ते सैराट हा कार्यक्रम उच्च अभिरूचीचा उत्तम कलाविष्कार आहे. अविट गोडीची गाणी, मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास सांगणारे ओघवते निवेदन आणि बहारदार नृत्याविष्कार ही प्रभात ते सैराटची वैशिष्टय आहेत.

यंदाच्या भिमा फेस्टिव्हलचे प्रायोजक गोकुळ दूध संघ असून, सहप्रायोजक आहेत,  इन्स्पायर अ‍ॅकॅडमी आणि अथायू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ! तर हॉटेल वृषाली, हॉटेल जोतिबा आणि हॉटेल के ट्री हे हॉस्पीटॅलिटी पाटर्नर आहेत. 13 आणि 14 जानेवारी रोजी सायंकाळी ठिक 6.30 वाजता कार्यक्रमांना प्रारंभ होईल. चॅनल बी च्या कैलाश टॉवर्स, असेंब्ली रोड येथील कार्यालयात भिमा फेस्टिव्हलच्या मोफत प्रवेशिका उपलब्ध आहेत. नागरीकांनी शुक्रवार पर्यंत चॅनल बी च्या कार्यालयातून भिमा फेस्टिव्हलच्या मोफत प्रवेशिका घेवून जाव्यात, असे आवाहन भिमा उद्योग समुहाचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक आणि चॅनल बी च्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!