भिमा कृषी प्रदर्शन 26 जानेवारी सुरुवात; हरियाणातील रेडा प्रदर्शनाचे खास आकर्षण : खा. महाडीक

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकर्‍यांना शेतीसाठी उपयुक्त असे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे गर्दीचा उच्चांक गाठणारे भिमा कृषी 2018 चे आयोजन येत्या 26 जानेवारी ते 29 जानेवारी 2018 या कालावधीत करण्यात आले आहे.शेतक र्‍यांना उपयुक्त असणारे सर्वात मोठे भव्य कृषी व पशुपक्षी प्रदर्शन असून ते  दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये येथील मेरीवेदर ग्राऊंड येथे भरविले जाते. यावर्षीचे प्रदर्शनाचे 11 वे वर्ष असून देशविदेशातील विविध प्रचलित कंपन्यांचा समावेश या प्रदर्शनामध्ये आहे.याचबरोबर  पशुपक्षी दालन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम,शेतकर्‍यांना उपयुक्त मार्गदर्शनपर तज्ञांची व्याख्याने आणि विविध कंपन्यांची उत्पादने ,शेतकर्‍यांसाठी विविध तंत्रज्ञान याची उपयुक्त माहिती मिळणारे असे हे सर्वात मोठे प्रदर्शन आहे.प्रदर्शनात हरियाणातील रेडा जो आता खूपच गाजत आहे तो खास आकर्षण असणार आहे.या प्रदर्शनाला सर्वानी आवर्जुन भेट द्यावी असे आवाहन खासदार धनंजय महाडीक यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.प्रदर्शनात 300 स्टॉलचा समावेश आहे.याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या मा.सौ.अरूंधती महाडीक यांच्या नेतृत्वाखाली 200 बचत गटांना मोफत स्टॉल देण्यात येणार आहेत.ज्याव्दारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला याठिक़ाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली जाणार असल्याचे खा.धनंजय महाडीक यांनी सांगितले.चारही दिवस शेतकर्‍यांना मोफत झुणका भाकरीचे वाटप याठिकाणी केले जाणार आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन  जिल्हयाचे पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

देशातील आघाडीच्या संशोधनपर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणार्‍या रिलायन्स पॉलीमर्स व रोनीक स्मार्ट यांचे या प्रदर्शनास प्रायोजकत्व लाभलेले आहे.याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या कृषिविभाग,आत्मा,जिल्हा परिषद कोल्हापूर,नॅशनल कमिटी ऑफ प्लॅस्टिक अ‍ॅप्लीकेशन इन हॉर्टीकल्चर(एन.सी.ए.पी.एच) यांचे सहकार्य लाभले आहे. भिमा उद्योग समुहासह क्रिऐटीव्ह यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.महाराष्ट्रातील सर्व बसस्थानकावर वृत्ती मिडीयाव्दारे या भिमा कृषी पशु प्रदर्शनाचे प्रसिध्दी केली जाणार आहे. वृत्ती मिडीया मिडीया पार्टनर आहेत.

या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या विविध कृषि केंद्रीत संस्था सहभागी होत आहेत.यामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी,समृध्दी,पारस शॉपी,सिल्व्हर पंप,एल अ‍ॅन्ड टी,रिलायन्स पॉलीमर्स,शिवशक्ती इंडस्ट्रिज,बारामती ट्रॅक्टर,सागर अ‍ॅटोमोबाईल,बुधले अ‍ॅन्ड बुधले,लक्ष्मी सेल्स अ‍ॅन्ड सर्व्हिसेस,मिल्सन आटा चक्की,किर्लोस्कर न्यू इरा,डेक्कन फार्म,क्युबोटा ट्रॅक्टर,युनोव्हा होम अप्लायन्सेस ,केऊल एंटरप्रायजेस,सायकॉन कंट्रोल सिस्टीम,व्हीरबॅक अ‍ॅनिमल हेल्थ प्रा.लि.,के.पी.टी.मिल्कींग मशीन प्रा.लि., अपूर्वा अ‍ॅटोमोबाईल,शेरखान लिमिटेड आदी कंपन्यांचा समावेश आहे.तर प्रदर्शनामध्ये मॅन्युफॅक्चरर ऑफ अ‍ॅग्रोकेमिकल्स ,पंप्पस, मॅग्नेटीक कॉन्डीशनिंग ऑफ वॉटर,आटा चक्की,नॅशनल फिड सुपरीमेन्डस फोर्ट पावडर,मिल्कींग मशीन्स,पॉवर ट्रेलर्स,रेनबो कंटेनर्स,अभिमान अ‍ॅग्रो,सेव्ह ग्रीनबॅग्स,कावीरा नॅचरल,ट्रॅक्टरर्स ,बी.बीयाणे,अवजारे,खते,औषधे आदी उत्पादने पहावयास  मिळणार आहेत.

प्रदर्शनामध्ये पाच महिलांना जिजामाता पुरस्कार देण्यात येणार आहे तर जिल्हयातील पाच शेतकर्‍यांना शेतीभूषण ,कृषी सहाय्यक 5,कृषी संशोधन व शास्त्रज्ञ 3यासह जीवनगौरव भिमा कृषी रत्न पुरस्कारही दिला जाणार आहे.पाच शेतकर्‍यांना शेतीभूषण पुरस्कार दिले जाणार आहेत.तर 10 शेतकर्‍यांना आदर्श शेतकरी पुरस्कार दिला जाणार आहे. आणि कृषी विभागाच्या वतीनेही चार दिवसानंतर उत्कृष्ट अशा शेतकर्‍यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा,पीकस्पर्धा,पशुस्पर्धांचे बक्षिसे ही दिली जाणार आहेत.आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जाणार आहे. तांदूळ महोत्सव असणार आहे ज्यामध्ये आजरा घनसाळ,रत्नागिरी चोवीस,भोगावती, इंद्रायणी अशा नमुन्यांचे तांदूळ असणार आहे तर पानलोट व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन आणि हायड्रॉलिक असे चारा तयार करणार्‍या उत्पादन कसे केले जाते हे पहावयास मिळणार आहे.तसेच भाजीपाला,ऊस आदीही पहावयास मिळणार आहे.

या प्रदर्शनात सध्या नॅचरल जॉग्रॅाफीवर व यु ट्यूब वर गाज असलेला देशात  नाव झालेला व दक्षिण अफ्रिकेतून 12 कोटी रूपयास मागणी केलेला हरियाणातील रेडा आणण्यात येणार आहे. जो खास आकर्षण ठरणार आहे.नांदेड मधील ला कंदारी गाय,लातूरमधील गाय,पंढरपूरमधील गायी,दिवसाला 40लिटर दूध देणारी एचएफ जर्शी गाय पहावयास मिळणार आहे.याचबरोर संकरित गायी म्हैशी याचबरोबर जाफरबादी नेहसाना जातीचा रेडा ,विविध तोतापुरी उस्मानाबादी शेळ्या व बोकड,ब्लॅक अ‍ॅस्टो खकडनाथ कोंबड्या,ससे,पांढरे उंदीर ,तसेच कुक्कुटपालन,इमूूपालन, वैशिष्ठयपूर्ण चिनी कोंबड्या,वेगवेगळे बैल,घोडे,वेगवेगळ्या प्रकारची कुत्री,पक्षी,विविध जनावरांच्या जाती पहावयास मिळणार आहेत.रविवारी चॅम्पियन ऑफ द शो होणार आहे ज्यामधून उत्कृष्ठ जनावरास पारितोषिक दिले जाणार आहे.पीक स्पर्धा,पुष्पस्पर्धा, विविध जनावरांच्या स्पर्धा खाद्य महोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.तसेच शासनाच्या विविध योजनांची माहितीही याठिकाणी दिली जाणार आहे.याचबरोबर कोल्हापूरातील कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मॅजिक शो,जागर लोकसंस्कृतीचा व बहारदार लावणी आणि हिंदी व मराठी गीतांसा सदाबहार असा गुंजन असे  सांस्कृतिक कार्यक्रम चार दिवस याठिकाणी असणार  आहेत.

तर दुपारच्या सत्रात 26 जानेवारीस किफायतशीर दुग्ध व्यवसाय कसा करावा,कृषि विभागाच्या बहुविध योजना या विषयावर ,27 जानेवारीस रिलायन्स पॉलीमर्सची शेतीउपयुक्त्त साधने,अधिक ऊस उत्पादनासाठी आधुनिक सिंचनातून पाणी व खत व्यवस्थापन,28जानेवारीस संरक्षित भाजीपाला व फुलशेती लागवड तंत्रज्ञान, आणि 29 जानेवारीस कमी खर्चात फायदेशीर शाश्वत ऊस शेती पध्दती,सेंद्रीय शेती एक गरज आदी विषयांवरकृषी तज्ञांची व्याख्याने होणार आहेत. तरी या प्रर्दशनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन संयोजक भिमा उद्योग समूहासह क्रिऐटीव्ह एक्झीबिशन अ‍ॅन्ड इव्हेंट संस्थेने  यांनी केले आहे. या भिमा कृषी प्रदर्शनाच्या संयोजनासाठी रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले,रोनीक स्मार्टचे तानाजी पवार,जे.पी.पाटील,धनवडेदादा ,डॉ.सुनील काटकर,डॉ.शिंदे वृत्ती मिडीयाचे प्रशांत पाटील ,श्रीधर बिरंजे,तसेच क्रिएटीव्ह इव्हेंटसचे सुचित चव्हाण हे आपल्या टीमसह कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!