
कोल्हापूर : भाजप सरकारने मेडिक्लेम योजना बंद केल्यामुळे राज्यभरातील लाखो कामगार व त्यांच्या कुटूंबियांना उपचाराविना तडफडून मरावे लागत आहे. त्यामुळे या सरकारच्या कामगार विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी आणि बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना सुरु करावी या मागणीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागणीचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना बंद केली. वाळू उपसा बंदी केल्यामुळे बांधकाम कामगारांना व त्यांच्या कुंटूबियांना उपासमारी सहन करावी लागत आहे. कामगारांसाठी असणार्या योजनाचा लाभ ही त्यांना घेता येत नाही. ही योजना अनेक कामगारांच्या कुटुंबातील प्राण वाचलेले आहेत. या योजनेमध्ये कोणताही खर्च कामगाराच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांवर पडत नव्हता. ही योजना पुन्हा सुरु करावी, अशी मागणीही यामध्ये केली आहे.
यावेळी, भरमा कांबळे, कॉ. शिवगोंडा खोत, संदिप सुतार, विजय राजिगरे, विकम खतकर यांच्यासह मोठया संख्येने लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार उपस्थित होते.
Leave a Reply