कोल्हापूर : मेरी वेदर ग्राउंडवर होणाऱ्या कृषी प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. शासनाचे आदेश प्राप्त झाल्या नंतर तातडीने आज महाडिक यांनी प्रदर्शनाच्या तयारीस सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी लाखो रुपये खर्च करून हे कृषी प्रदर्शन भरवत असतो. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यामुळे परवानगी मिळाली असून ग्राउंडचे कोणतेही नुकसान होत नाही आणि आम्ही तशी काळजी घेतली आहे तरी केवळ राजकीय द्वेषापोटी विरोध केला आहे. कोल्हापूरच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना अशा गोष्टीवर लक्ष न त्यांनीही विकासाची कामे करण्याकडे लक्ष द्यावे असा टोलाही त्यांनी मारला.
प्रदर्शनामुळे ग्राउंडचे नुकसान होत असल्याच्या कारण पुढे करत मेरी वेदर ग्राउंड वर होत असलेल्या कृषी प्रदर्शनास विरोध करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर मैदानावर खड्डे तसेच पडतात तसेच खाण्याच्या स्टॉल मुळे दुगंधी पसरून मैदानाचे नुकसान होते त्यामुळे खेळाव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमासाठी मैदान वापरण्यास परवानगी देवू नये असे निवेदन खेळाडूंच्या वतीने आयुक्ताना देण्यात आले होते. २० फेबुवारी रोजी महापालिका सर्वसाधारण सभेत खेळाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी दिले जाऊ नये असा ठराव केला व प्रदर्शनासाठी मैदान देता येणार नाही असे कळवले. त्यानंतर १७ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली १८ जानेवारी रोजी मैदान प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवण्यात आला व आज परवानगी मिळाल्याचे आदेशही प्राप्त झाले. महाडिक यांनी कृषी प्रदर्शनाची तयारी सुरु केली आहे. परवानगीच्या मुद्द्यावरून पुन्हा महाडिक विरुद्ध पाटील असे वाद समोर आला असून केवळ राजकीय द्वेषापोटीच हे सर्व आमदार सतेज पाटील यांनी केले असल्याचेही यांनी सांगितले.
कृषी प्रदर्शनातून गेल्या १० वर्षात अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. कृषी प्रदर्शनामुळे शेतकर्यांना नवीन तंत्रज्ञान मिळत आहे तसेच ६ ते ७ कोटी रुपयांची उलाढाल होते. असते असे असताना केवळ राजकीय द्वेष आणि त्रास देण्य्याच्या हेतूने हा विरोध केला. आताच त्यांना क्रीडा आणि खेळ याबाबत आताच आत्मीयता त्यांना झाली. प्रतक्ष किती स्पर्धा भरवल्या आहेत? असा प्रश्न देखील यांनी यावेळी उपस्थित केला. कोल्हापूर शहराच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित पडले आहेत. आम्ही समाजाच्या तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी पदरमोड करून लाखो रुपये खर्च करत असतो असे असताना केवळ अशा गोष्टींच्याकडे लक्ष न विकासाची कामे करावीत असा टोलाही यांनी यावेळी मारला.

Leave a Reply