आय इंडीयन जनजागृती रॅली

 

कोल्हापूर : जात-पात-धर्म बाजूला सारुन आपण सारे भारतीय बांधव एक आहोत ही भावना लोकांच्या मनात रुजवणे, या हेतूने प्रजासत्ताक दिनी ‘आय इंडीयन रॅली’ सकाळी ९ वा. बिंदु चौकातून निघणार असल्याची माहिती राज कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, कोल्हापूर शहरात एक वेगळा संदेश देत सामाजिक सलोखा जपण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिव्यांग बांधवाच्या हस्ते आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुधती महाडीक, जि.प.अध्यक्षा शौमिका महाडीक , प्रतिभा पाटील, मधुरीमाराजे छत्रपती, सरोज शिंदे, प.महाराष्ट् देवस्थान समिती कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, माजी महापौर सई खराडे आदि मान्यवरांच्या उपस्थित राहणार आहेत.
यामध्ये नृत्यचंद्रिका संयोगीता पाटील यांचे पथक, ढोल वादक, लाठी काठी, लेझीम पथक, पैलवान पथक, तसेच विविध लक्षवेधी फलक यांचा समावेश असल्याच ही त्यांनी सांगितल. या रॅलीचा मार्ग बिंदु चौक, छ.शिवाजी चौक, महानगरपालिका, दसरा चौक. असा असून यांची सांगता दसरा चौकात होणार आहे.  तरी या रॅलीमध्ये सहभागी होण्याच आवाहन संयोजकांनी केल आहे.
यावेळी सौरभ कुलकर्णी, क्षितिजा देशपांडे, नमित आवटे, आदित्य सावंत आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!