
कोल्हापूर/प्रतिनिधी : रेडिओ सिटी या देशातील आघाडीच्या रेडिओ नेटवर्कमध्ये आज रेडिओ सिटी सिने अॅवॉर्डस् मराठीची घोषणा केली.त्याव्दारे मराठी चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांना गौरविण्यात येणार आहे. तेलगू,कन्नड,तमीळ भाषिक दोन कोटी श्रोत्यांच्या प्रतिसादानंतर आता नवा विक‘म करण्यासाठी रेडिओ सिटी सिने अॅवॉर्डस् मराठी सज्ज झाले आहे.मराठी चित्रपटसृष्टीतील तार्यांची ही निवड श्रोत्यांच्या मतदानातून केली जाणार आहे. या पुरस्कारांच्या ट्रॉफीचे अनावरण प्रसिध्द सिनेकलाकारांच्या उपस्थितीत झाले.यामध्ये सोनाली कुलकर्णी,संजय जाधव,भूषण जाधव,नानुभाई,ऋषिकेश रानडे,सावनी रविंद्र, जतीन वागळे,विश्वास जोशी, भार्गवी चिरमुले आणि सुमेध मुद्गलकर यांचा समावेश होता.
टिझर,प्रोमोज आणि सेलिबेट्रींची उपस्थिती याव्दारे या उपक‘माचे प्रसारण झाले.रेडिओ सिटीच्या डिजीटल व्यासपीठावर सेलिब‘ेटी व्हिडीओच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यत पोहोचणार आहेत. त्यासाठी सिटीसिनेअॅवॉर्डस्मराठी हा हॅशटॅग तयार करण्यात आला आहे.या उपक‘माच्या उद्घोषणेप्रसंगी रेडिओ सिटीचे सीईओ अब‘ाहम थॉमस यांनी आम्हाला तेलगु,तमिळ आणि कन्नड श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद आणि या कार्यक‘माला मोठे यश मिळाले.त्यामुळे आता महाराष्ट्रात मराठी रेडिओ सिटी सिने अॅवॉर्डस् पाऊल उचलण्यास आम्हाला आनंद वाटतो आहे असे सांगितले.आम्ही लवकरच पंजाबी, गुजराती आणि भोजपूरी श्रोत्यांकडे वळणार असल्याचेही सांगितले.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बोलताना म्हणाली मराठी चित्रपट सृष्टी ही मराठी प्रेक्षकांशी देशभरात जोडली गेली आहे. रेडिओ सिटी पुरस्कारांच्या माध्यमातून मराठी कलाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान होणार आहे. त्याचबरोबर श्रोत्यांना त्यांचा आवडता कलाकार निवडण्यासाठी एक पारदर्शक व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे सांगून प्रेक्षकांनी नेहमीच मराठी चित्रपट आणि संगीत याला प्रोत्साहन दिले आहे. श्रोतेही नक्कीच त्यांचे प्रेम आपल्या मताव्दारे व्यक्त करतील असा विश्वास वाटतो असे सांगितले.यामध्ये श्रोत्यांना रेडिओ,एसएमएस,फेसबुक,टविटर,व्हॉटस्अप यांच्या माध्यमातून आपले मत नोंदविता येणार आहे. सेलिब‘ेटींचे नामांकन 12 विविध विभागांसाठी केले जाणार आहे.त्यामध्ये बेस्ट डिरेक्टर,बेस्ट अॅक्टर,बेस्ट अॅक्टर, बेस्ट डेब्यु मेल,बेस्ट डेब्यू फिमेल,बेस्ट व्हिलन,बेस्ट अॅक्टर इन कॉमिक रोल,बेस्ट म्युझिक डायरेक्टर, बेस्ट लिरीसिस्ट, बेस्ट सिंगर मेल आणि बेस्ट सिंगर फिमेल यांचा समावेश आहे. विजेत्यांच्या गौरव सोहळ्याचे प्रसारण ही केले जाणार आहे.यामध्ये श्रोत्यांना थेट डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूडॉटरेडिओसिटीडॉटइन या वेबसाईवरही आपले मत नोंदविता येणार आहे.
Leave a Reply