
नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशाचा ६९वा प्रजासत्ताक दिन साजरा. राजधानी दिल्लीतल्या राजपथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचं, सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडवणारी परेड हे या दिवसाचं मुख्य आकर्षण होते.
१. दरवर्षी २६ जानेवारीला एका देशाचे राष्ट्रप्रमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात. यंदा पहिल्यांदाच एकाचवेळी १० राष्ट्रांच्या प्रमुखांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं. भारत-आसियान राष्ट्रांच्या संबंधाला २५ वर्षे पूर्ण होतायत त्यानिमित्तानं आसियानमधल्या थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स, सिंगापूर, म्यानमार, कंबोडिया, लाओस, ब्रुनोई या दहा देशांचे प्रमुख या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासाठी १०० फूट लांब बुलेटप्रुफ काच उभारली गेली.
२. राजपथावर डेअर डेव्हिल्सच्या बाईकवरच्या कसरती दरवर्षी श्वास रोखून धरायला लावणाऱ्या असतात. यंदा पहिल्यांदाच बीएसएफच्या महिला जवानांचं पथक या बाईकवरच्या कसरती दाखवणार आहे. सीमा भवानी ( बाँर्डर ब्रेव्हज) असं या पथकाला नाव देण्यात आलं आहे. राँयल एनफिल्ड बुलेटवरुन दाखल होत 27 महिला जवानांचं पथक यंदा १६ प्रकारच्या चित्तथरारक कसरती दाखवणार आहे. ज्यात पिरॅमिड, फिश रायडिंग, शक्तिमान, बुल फायटिंग अशा फाँर्मेशनचा समावेश होता. .
३. दरवर्षी राजपथावर ते ठुमकत, लचकत ऐटीत दाखल झाले की टाळ्यांचा सर्वाधिक पाऊस पडतो. बीएसएफच्या नखशिखान्त सजवलेल्या उंटांचं पथक याही वर्षी परेडचं मुख्य आकर्षण असणार आहे, त्यांच्यासोबत 51 घोडेस्वारांचं पथकही जोडण्यात आलं.
४. राजपथावर जे सांस्कृतिक चित्ररथ सादर होतात, त्यात पहिल्यांदाच आँल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीचा चित्ररथ सादर होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’चं प्रदर्शन यातून झाले.
Leave a Reply