पंचगंगा पुलावरून बस कोसळून 13 ठार

 

कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलावर रात्री पावणेबाराला सतरा सीटर बस नदीत कोसळली. या अपघातात १3 जण ठार झाली असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटेच बस बाहेर काढण्यात अग्निशमनच्या जवानांना यश आले आहे. सर्वजन बालेवाडी आणि पिरगुटे येथील आहेत. गणपतीपुळे येथून दर्शन घेऊन परत येत असताना हा अपघात झाला. केदारी ,नांगरे,वरखडे, हे तीन कुटुंबे सलग तीन दिवस सुट्टी असल्याने देवदर्शनासाठी बाहेर पडले होते. गणपतीपुळे येथे दर्शन घेऊन ते कोल्हापूरला निघाले होते.जेवण करून सर्वजण कोल्हापुरात येऊन मुक्काम करणार होते. मात्र त्यांची बस रात्री पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाच्या संरक्षण भिंतीला त्यांच्या बसने जोरदार ठोकर दिली. कठडा तोडून बस थेट नदीत कोसळली. चौकात बसलेल्या काही तरुणांनी ही घटना पाहताच त्यांची तातडीने मदतीसाठी धावाधाव केली.परिसरातील काही स्थानिक नागरिक आणि तरुणांनी पाण्यात उडया घेऊन एकेकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.जखमींवर सी.पी.आर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. अजूनही एक सहा महिन्याचे बालक बेपत्ता आहे ,त्याचा शोध जीवन ज्योती आणि व्हाईट आर्मी यांच्या मदतीने बोटीने घेण्यात येणार आहे

26/1/2018 रोजी रात्री 11-45 वाजता पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल कोल्हापूर येथे टँपो ट्रॅव्हलर मिनी बस क्रं. एमएच-१२ एनएक्स 8550 ही 100 फुट उंचीवरुन वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. शासकिय कर्मचारी , स्थानिक नागरीक, स्वंयसेवी संस्था यांनी  त्वरीत घटना स्थळी धाव घेवून मृत तसेच जखमींना ताबडतोब शासकिय रुग्णालयात दाखल करणेत आले.  सदर मदत कार्य अविरतपणे दि.27/1/2018 रोजी सकाळी 8-00 वाजेपर्यंत सुरु होते. सदर वाहनातील प्रवासी हे पूणे जिल्हयातील बालेवाडी  व पिरंगुट येथील रहिवाशी आहेत.  सदर अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 6 पुरुष व 7 स्त्रिया असून त्यामध्ये 16 वर्षाखालील 7 मुला मुलींचा समावेश आहे.  तसेच सदर अपघातात 3 स्त्रिया गंभिर जखमी आहेत.
मृत व्यक्तींची नांवे खालील प्रमाणे :-
अ.क्रं. मृत व्यक्तीचे नांव वय
1संतोष बबनराव वरखडे 45 वर्षे
2 गौरी संतोष वरखडे 16 वर्षे
3 ज्ञानेश्वरी संतोष वरखडे 14 वर्षे
4 सचिन भरत केदारी 34 वर्षे
5 निलम सचिन केदारी 28 वर्षे
6 संस्कृती सचिन केदारी 8 वर्षे
7 सानिध्य सचिन केदारी 9 महिने
8 साहिल दिलीप केदारी 14 वर्षे
9 भावना दिलीप केदारी 35 वर्षे
10 श्रावनी दिलीप केदारी 11वर्षे
11 छाया दिनेश नांगरे 41 वर्षे
12 प्रतिक दिनेश नांगरे 14 वर्षे
13 अज्ञात वाहन चालक 28 वर्षे

जखमी व्यक्तींची नांवे खालील प्रमाणे :-
अ.क्रं. जखमी व्यक्तीचे नांव वय
1 प्राजक्ता दिनेश नागरे 18 वर्षे
2 मनिषा संतोष वरखडे 38 वर्षे
3 मंदा भरत केदारी 54 वर्षे

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!