कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नाट्य,चित्रपट,कलापथक व कलेवर परम असणारे कलाकार तंत्रज्ञ निर्माते दिग्दर्शक इत्यादी जुने,नवे सर्वजण एकत्र येऊन कलेचा विस्तार व्हावा तसेच त्यामधील अडचणी सोडवून मार्ग काढण्यासाठी ११ ऑगस्ट २०१६ रोजी मराठी नाट्य,चित्रपट कलाकार तंत्रज्ञ मल्टीपर्पज असोशिएशनची स्थपना केली.कलेची एक चळवळ उभा करण्यासाठी नाट्य स्पर्धा,एकांकिका स्पर्धा,शॉर्ट फिल्म महोत्सवाचे आयोजन केले जाते.याची सुरुवात म्हणून गेल्या वर्षी मा.रामभाऊ चव्हाण (दादा) यांच्या स्मरणार्थ शॉर्ट फिल्म महोत्सव भरविला त्यास कोल्हापूर तसेच इतर भागातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. याच नावाने सलग दुसऱ्या वर्षीही हा महोत्सव भरवत आहोत.येत्या शनिवारी दि १० फेब्रुवारी व रविवार दि. ११ फेब्रुवारी या दोन दिवशी हा महोत्सव शाहू स्मारक भवन,दसरा चौक येथे होणार आहे अशी माहिती असोशिएशनचे अध्यक्ष आकाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवात कोल्हापूरसह पुणे,सांगली,सातारा, फलटण,सोलापूर,अहमदनगर या भागातील स्पर्धकांनी भाग घेतला आहे. महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी १० फेब्रुवारी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्याचे कृषी,पणन,फलोत्पादन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्य मंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.यावेळी चित्रपट कवी मा.बापू घराळ,विनोदी कलाकार मा.लक्ष्मण जाधव यांना आर्थिक मदत देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
दुसऱ्या दिवशी रविवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत शॉर्ट फिल्म सादरीकरण करण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता महापौर स्वाती यवलुजे,अभिनेत्री सौ.लता अंधारे-भोसले आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे.यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष महेश पन्हाळकर,सुनील माने,खजानीस सदाशिव पाटील,सतीश बिडकर, सदाशिव सूर्यवंशी, गौतम सावंत,अशोक जाधव यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी,संचलक,सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply