“पानिपत” चित्रपटाच्या चित्रिकरणास कोल्हापुरात प्रारंभ

 
कोल्हापूर: श्री वेंकटेश्वरा मुव्हीज् इंटरनॅशन ची निर्मिती असलेला व अभय कांबळी दिग्दर्शित ‘पानिपत’ या चित्रपटाचा मुहूर्त कोल्हापूर चित्रनगरी येथे संपन्न झाला असून कोल्हापूरातून पानिपत या ऐतिहासिक चित्रपटाच्या चित्रिकरणास प्रारंभ झाला आहे.
इतिहासात पानिपत लढाईचे वेगळे महत्त्व आहे.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. 1750 च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बर्‍याच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व 7 ते 8 शतके राज्य करण्यार्‍या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. परंतु भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इ.स. 1758 मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अब्दालीचा मुलगा तिमूर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती म्हणून मराठ्यांनी पण 1 लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे कूच केले आणि 14 जानेवारी 1761 ला पानिपत मध्ये तिसरे घनघोर युद्ध झाले ज्यात मराठ्यांचा पराभव झाला.
याच युद्धावर आधारित निर्माते अजय प्रभाकर कांबळी हा चित्रपट बनवीत असून या चित्रपटाचे शिषर्कही ‘पानिपत’ हेच आहे. सखोल संशोधनाच्या आधारे चित्रपटाची कथा-पटकथा लिहिलीय श्री अभय प्रभाकर कांबळी यांनी आणि ‘पानिपत’ चे दिग्दर्शनही तेच करणार आहेत.
याचित्रपटात आनंद जोशी,अमित जांभेकर,रोहण पेडणेकर,उमाकांत पाटील,श्रीकांत कुलकर्णी व तृप्ती घोडणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत
श्री वेंकटेश्वरा मुव्हीज् इंटरनॅशनल ची निर्मिती असलेला व अभय कांबळी दिग्दर्शित ‘पानिपत’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला  प्रारंभ झाला असून तो 2018 च्या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.असे निर्माते व दिग्दर्शकानी सांगितले असून हा चित्रपट प्रेक्षकांना इतिहासाचा जाज्वल्यपणा दाखविल व तो सर्वांना भावेल असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!