
कोल्हापूर: हिमालयासारखा नाही तर सह्याद्रीसारखा मी या सहकारी बँकांच्या पाठीशी उभा आहे, कारण हिमालयाचा बर्फ वितळतो पण सह्याद्रीचा काळा पाषाण कधीही मोडत नाही.अखंडपणे उभा असतो त्याप्रमाणेच मी या सहकार चळवळ टिकवून ठेवणाऱ्या सहकारी बँकांच्या पाठीशी उभा आहे असे व्यक्तव्य आज माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी काढले.राजर्षी शाहू गव्हर्नमेंट को-ऑप बँकेच्या शताब्दी सोहळ्यात ते बोलत होते.सहकारच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी साध्य करू शकतो.आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य माणसाला मजबूत करणे अशीच बँकेची ध्येयधोरणे आहेत. एन.पी.ए नाही म्हणजेच शून्य टक्के आहे हा इतर सहकारी बँकांसाठी आदर्शवत आहे.कर्जापोटी भरमसाठ व्याज भरावे लागणे यासाठी संसार उध्वस्थ होतात.हे टाळण्यासाठीच सहकार चळवळ आहे.कर्जवसुलीसाठी संचालकांना जबाबदार न धरता त्या व्याकीकडून वसुली करण्यासाठी कायदा केला पाहिजे तर सहकार चळवळ जिवंत राहील.९७व्या दुरुस्ती मुळे बँकांचे विलीनीकरण थांबले.ताराराणीच्या या संस्थानात महिलांना निर्णय प्रक्रियेत घेणे गरजेच आहे.अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्ती केली.
राजर्षी शाहूमहाराज यांनी समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले.त्यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या या बँकेने कोल्हापूरच्या सहकर चळवळीला दिशा दिली.ही बँक म्हणजे माईल स्टोन आहे असे उद्गार माजी मंत्री सुनील तटकरे यांनी काढले.सरकारी कर्मचाऱ्यांची ही एकमेव बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने बँकेला जिल्हा बँकेकडे मदत मागायची वेळ येणार नाही असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला. या बँकेचा आदर्श आज संपूर्ण महाराष्ट्र घेत आहे आणि अशीच प्रगत होत राहिली तर सव भारतात ही बँक एक आदर्श ठरेल असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी काढले.बँकेचे अध्यक्ष रवींद्र पंदारे यांनी बँकेच्या १०० वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रिमोटच्या सहाय्याने करण्यात आले.तसेच माजी अध्यक्ष,संचालक,बेटी बचावो बेटी पढाओ या उपक्रमांतर्गत ठेव पावतीचे वितरण करण्यात आले.यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी खा.निवेदिता माने,प्रा.संजय मांडलिक,माजी आमदार के.पी.पाटील,माजी आमदार प्रकाश आवडे,मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे,उपाध्यक्ष राजेंद्र पाटील,संचालक मधुकर पाटील,शशिकांत तिवले,प्रकाश पाटील,राजेंद्र चव्हाण,भरत पाटील,अतुल जाधव,रमेश घाटगे,विलास कुरणे,हेमा पाटील,नेहा कात्रे यांच्यासह संचालक,पदाधिकारी आणि बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply