दिल्लीत शिवजयंती सोहळयाचे आयोजन

 

कोल्हापूर :वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी शिवजंयती सोहळा ( दि. १९, २०) रोजी दिल्ली येथे होणार असल्याची माहिती श्रीमंत संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली .
यावेळी ते म्हणाले, शिवछत्रपती च्या कर्तुत्त्वाचा वारसा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचावा, आणि शिवजयंती राष्ट्रोत्सव म्हणून साजरा केला जावा या हेतूने या सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून, दि .१९ रोजी सकाळी ९ वाजता दिल्लीतील संसदेच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. नवीन महाराष्ट्र सदन येथे शिवजन्मोत्सव सोहळ व शाहिरी कार्यक्रम, त्यानंतर मदाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग , राजपथ ते इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रापर्यत शोभायात्रा दुपारी १ वाजता इंदिरा गांधी राष्ट्रीय क्ला केंद येथे शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या छायाचित्र व ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन , डॉक्यूमेंट्रीचे सादरीकरण, रक्तदान शिबिर, पुस्तक प्रकाशन त्याचबरोबर सायंकाळी 6 वाजता. मान्यवरांच्या हस्ते शिवमूर्तिस अभिवादन करून शिवछत्रपतीच्या जीवनावर आधारित शिव गर्जना या महानाट्याचा प्रयोग सादर केला जाणार आहे . तर दि. २० रोजी सायंकाळी शिव गर्जना या महानाट्याच पुन्हा सादरीकरण केल जणार आहे . या नाटकामध्ये ३०० कलाकारांचा सहभाग आहे . तसेच या सोहळ्या मध्ये तीनशे कलाकारांच ढोल पथक, साठ कलाकारांच ध्वज पथक, बारा कलाकारांच तुतारी पथक , दोनशे जणांची वारकरी दिंडी, सत्तर कलाकारांची लेझीम पथक, बारा हलगी वादक, वीस शाहिरी पथक , तसेच मर्दानी खेळ , मल्लखांब, धनगरी ( गज ) ढोल पथक, आदिचा समावेस असणार आहे. तसेच अनेक लोक कलाकार पारंपारिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. या सोहळयासाठी १५ हजार लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती संभाजीराजे यांनी सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!