कोल्हापूर : भारतीय समाजव्यवस्थेचा कणा असलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारे सिद्धगिरी कारागीर ज्ञानपीठसह लखपतीशेती, गोशाळा असे सिद्धागीरीचे विविध उपक्रम अणुकरणीय असे आहेत त्याची गाव तालुका पातळी पर्यंत व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे सर्वतोपरी सहाय्य आणि सहकार्य राहील, असे जाहीर अभिवाचन राज्य महसूल तथा पालक मंत्री चंद्र्कांत पाटील यांनी केले. कणेरी मठ येथे आयोजित केलेल्या कारागीर कुंभ मेळेच्या उद् घाटन प्रसंगी बोलत होते.
गेली ३ महिने तयारी सुरु असलेल्या सिद्धगिरी कारागिरी महाकुंभास आज सकाळी अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. राजकोट गुजरात येथील स्वामीनारायण संस्थांचे स्वामी त्यागवल्लभ दासजी यांच्या शुभहस्ते सिद्धगिरी ज्ञानपीठाचे उद्घाटन झाले.उत्तरप्रदेश रायबरेली येथील संस्थानचे बडे राजा श्री कौशेलेंद्रसिंहजी यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजन करून शोभा यात्रेस प्रारंभ झाला. या यात्रेत कणेरी गावच्या महिला वर्ग कलशासह तसेच सिद्धगिरी गुरुकुलचे विद्यार्थी व भक्तगण पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. धनगरी ढोल, लेझीम पथक, सजवलेली घोड्याची सवारी यासह अब्दागिरी आदींचा यात समावेश होता. यावेळी मठाधिपती प.पु. श्री अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी, प.पु. मुप्पिन्न काडसिध्देश्वर स्वामीजी, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार सतेज पाटील, राजकोट गुजरात येथील स्वामीनारायण संस्थांचे स्वामी त्यागवल्लभ दासजी यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते. रांगोळ्यांनी व रंगीत पताकांनी सजलेल्या मार्गावरून ही शोभा यात्रा प्रदर्शन असलेल्या तलावा समोरील विश्वकर्मा नगरात पोहोचली.
मान्यवरांनी गोपूजन करून दिपप्रज्वलन करून व्यासपीठावर मान्यवर विराजमान झाले. सर्वांचे स्वागत करताना प.पु. श्री अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी यांनी इंग्रजांनी जाणीवपुर्वक स्वयंपूर्ण भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था, स्वयंपूर्ण शिक्षण आणि श्रद्धास्थाने याचे खच्चीकरण केले, त्यामुळेच खेडी ओस पडू लागली. हे चित्र बदलण्यासाठीच सिद्धगिरी मठाने’ सेंद्रिय शेती, गोपालन, यासह आता हे कारागीर ज्ञानपीठ सुरु केले
आहे. त्याचे समाजाने विविध भागात स्थानिक पातळीवर कृतीशील अनुकरण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
आपल्या अद्ध्याक्षीय भाषणात पालकमंत्री पाटील यांनी सिद्धगिरी कणेरी परिसरातील पक्के रस्ते बांधणीसाठी ८५ लाखाचा राज्य शासनाचा तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने साडे तीन कोटीचा निधी जाहीर केला. तसेच सिद्धगिरीच्या एलपीजी मुक्त खेडेगाव तसेच सामुहिक भाजी पाल्यासाठी शेडनेट या उपक्रमातही आपला पूर्ण सहभाग असेल असे घोषित केले.
यावेळी शुभेच्छा देताना केंद्रिय पर्यटन राज्य मंत्री श्रीमती कृष्णा राजजी यांनी खेडेगाव केंद्रित परिपूर्ण ग्रामव्यवस्था सक्षम करण्यासाठी पारंपारिक कला व कलात्मक वस्तू निर्मितीत युवा वर्गाने सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे, त्यासाठी सिद्धगिरी कारागिरी ज्ञानपीठ हे एक रोल मॉडेल ठरेल, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्यासह केंद्र शासनाचे समन्वय केंद्र सिद्धगिरीत सुरु करण्याची घोषणा केली.
केंद्रिय खादी ग्रामोद्योग विभागाच्या श्रीमती शीला राव, श्रम केंद्रित शिक्षण व्यवस्था आणि सुतकताई सह, खादी निर्मिती यामुळेच पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्था भरारी घेईल, यात सिद्धगिरीचे भरे योगदान असेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी राजकोट गुजरात येथील स्वामीनारायण संस्थांचे स्वामी त्यागवल्लभ दासजी यांनी युवावर्गाला ग्रामीण भागाकडे आनंदाने परत नेण्याची सुरुवात दमदारपणे झाली आहे, अशा शब्दात आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या, यावेळी गृह राज्यमंत्री दिपक केसरकर तसेच रायबरेली येथील संस्थानचे बडे राजा श्री कौशेलेंद्रसिंहजी यांनी शुभेच्छापर भावना व्यक्त केल्या. शेवटी आभार व्यक्त करताना धनंजय महाडीक यांनी सिद्धगिरी परिसर सर्वासाठी प्रेरणादायी असल्याचे संगितले. या वेळी व्यासपीठावर आ.अमल महाडीक, माजी मंत्री अन्नासाहेब डांगे, गोवा राज्याचे के.डी.राव, निपाणीचे उद्योजक अन्नासाहेब जोल्ले, सह मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनात विविध आकर्षणे,
देशी गाई स्पर्धा व पर्दाषण विभागात दोन फुटाची गाई तसेच १२ लिटर दुध देणारी गाय, गीरचा नंदी तसेच कारागीर विभागात हात माल तसेच घोंगडी निर्मिती यांच्या सह १०० हून अधिक कलाकृती आकर्षण ठरले आहे.

Leave a Reply