
कोल्हापूर: विवेकानंद कॉलेज येथे यु.जी.सी. च्या अनुदानामधून शिवाजी विद्यापीठ व शासन मान्यताप्राप्त कौशल्यावर आधारीत बी. व्होक. ग्राफिक डिझाईन व फौण्ड्री टेक्नॉलॉजी विभागाचे पदवी व पदवीका कोर्सेस गेली 3 वर्षे सुरु आहेत. तसेच कम्युनिटी कॉलेज अंतर्गत डिप्लोमा इन फौण्ड्री टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम फौंड्री मधील काम करणार्यांसाठी सुरु आहे.
बी. व्होक. ग्राफिक डिझाईन विभागातून भाग-1,2 व 3 च्या विद्यार्थ्यांच्या वर्गकामांचे व कलाकृतींचे वार्षिक कलाप्रदर्शन स्पंदन-2018 फेब्रुवारीमध्ये दि. 14 ते 16 दरम्यान आयोजित करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभासाठी उदघाटक म्हणून पूणे येथील जेष्ठ चित्रकार व कला अभ्यासक मा. सुधाकर चव्हाण उपस्थित राहणार आहेत. नुकतेच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कलासंचालनालय, मार्फत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. विविध कलासंस्थांमध्ये तज्ञ सल्लागार व अभ्यागक अधिव्याख्याता म्हणून ते महाराष्ट्रभर कार्यरत आहेत.तसेच कला विषयक कार्यशाळांमध्ये मार्गदर्शक म्हणून देश-परदेशात ते कार्य करीत आहेत. पूण्यातील आर्ट टू डे गॅलरीचे संचालक तसेच भारतीय कला महाविद्यालय,वालचंदनगरचे संस्थापक आहेत. त्यांची ऑस्ट्रेलिया, यु.के. सह इतर विविध ठिकाणी प्रदर्शने झाली आहेत. नुकतेच मेलबोर्न ऑस्ट्रेलिया येथे सोलो शो झाला आहे. बालभारती कलासंचालनालय, राज्य शिक्षण शास्त्र संस्था एस.एस.सी. बोर्ड, पुणे विद्यापीठ याठिकाणी कला शिक्षण तज्ञ म्हणून कार्य केले आहे. स्पंदन प्रदर्शनामध्ये सुधाकर चव्हाण सरांचा चारकोल पेंटिंग यावर कार्यशाळा तसेच प्रात्यक्षिक आयोजित केले आहे.
तसेच प्रमुख पाहूणे प्रा. डॉ. सुभाष पवार, पूणे यांचे डिजिटल आर्ट या विषयावर परिसंवाद व स्लाईड शोचे आयोजन केले आहे. सरांनी अॅप्लाईड अॅण्ड डिजिटल आर्टस् यामध्ये पी.एच.डी. प्राप्त केली आहे.तसेच पूणे विद्यापीठाचे अभ्यासक्रम मंडळाचे ते सदस्य आहेत. विविध कला संस्था महाविद्यालयाचे अभ्यागत आधिव्याख्यता म्हणून कार्यरत आहेत.महाराष्ट्र शासनाचा बेस्ट बुक प्रोडक्शन आणि बेस्ट मराठी लिटररी अॅवॉर्डने त्यांना गौरविण्यात आले आहे अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. तसेच विविध वर्तमानपत्रे, पुस्तकांमध्ये त्यांनी कलविषयक लेख प्रसिद्ध केले आहेत. तसेच स्क्रीन प्रिंटीग, कोरल ड्रॉ, फोटोशॉप, जाहिरात या विषयावर शंभरावर पुस्तकांचे लिखाण व प्रकाशन केले आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे भुषविणार आहेत. तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा, मा. प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांची प्रमुख उपस्थिती आहे.
गुरुवार दि. 15 फेब्रुवारी 2018 रोजी मुंबई येथील सुप्रसिद्ध चित्रकार सुरभी गुळवेलकर यांचे व्यक्तीचित्रणाचे प्रात्यक्षिक होणार आहे. विविध कला संस्थांकडून त्यांना अॅवॉर्डस प्राप्त झाली आहेत. तसेच दि फॉरेन्स अॅकॅडमी ऑफ आर्ट इटली येथील स्कॉलरशिप आणि यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप बाय मिनिस्ट्री ऑफ कल्चरल ही भारत सरकारचीही स्कॉलरशिप मिळविलेली आहे. विविध आर्टकॅम्प व वर्कशॉपमध्ये मार्गदर्शन व सहभाग आहे. सध्या डॉ. डि. वाय. पाटील कॉलज ऑफ अॅप्लाईड आर्ट, पूणे येथे प्राध्यापिका आहेत.
शुक्रवार दि. 16 फेब्रूवारी 2018 रोजी विवेकानंद संस्थेतील माजी विद्यार्थी शिल्पकार मा. प्रशांत गायकवाड, कराड यांचे व्यक्तीशिल्पाचे प्रात्यक्षिक आयोजीत केले आहे. तसेच त्यांना कलाक्षेत्रातील कार्याबद्दल बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित केले आहे. विविध कलाप्रदर्शने प्रात्यक्षिके व कार्यशाळांमध्ये सहभाग व मार्गदर्शन केले आहे. तसेच विविध कलासंस्थांच्या महाविद्यालयांमध्ये चित्र व शिल्पकलेचे प्रात्यक्षिके झाली आहेत.तसेच 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डेनिमित्त विद्यार्थ्यांसाठी लव आर्ट डे साजरा करण्यात येणार आहे. यात आपल्याला येणारी कला प्रात्यक्षिकसह सादर करायची आहे.
सदर कलाप्रदर्शनाच्या प्रात्यक्षिकांचा व कार्यशाळांचा लाभ विद्यार्थी व कलारसिक यांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर व समन्वयक प्रा. एस. बी. गायकवाड यांनी केले.यावेळी प्रसिद्धी प्रमुख बी. के. गोसावी,विभाग प्रमुख प्रा. राहुल इंगवले, प्रा. सतिश उपळाविकर, प्रा.धिरज निंबाळकर उपस्थित होते.
Leave a Reply