
कोल्हापूर :असेसियोशन ऑफ आर्किटेक्ट ॲन्ड इंजिनीयर्स आणि इ्स्टिटट्युट ऑफ इंडियन इंटिरीयर डिझायनर्स कोल्हापूर चॅप्टरतर्फे बुधवार दि.१४ रोजी साय.६वा साठमारी येथे ‘पुरातन वास्तु संवर्धन या विषयावरील दृकश्राव्य सादरीकरण होणार आहे. पुण्याचे प्रसिद्ध वास्तूविषारद किरण कलमदाणी आणि अंजली कलमदाणी हे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती इंडियन इंटिरीयर डिझायनर्स कोल्हापूर चॅप्टरचचे अध्यक्ष पार्षद वायचळ आणि असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनिअर्स,कोल्हापूर चे अध्यक्ष सुधीर राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी वायचळ म्हणाले, कोल्हापूर शहराला मोठा ऐतिहासीक वारसा लाभला आहे. या वास्तुंचे संवर्धन होणे गरजेचे आहे. तर या वास्तुंच्या अभ्यासातून पुढील पिढीला दिशा देणे आवश्यक आहे. म्हणूनच या दोन्ही संस्थांतर्फे पुरातन वारसा वास्तू संवर्धन या सादरीकरणाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमासाठी पुरातन वारसा असलेल्या साठमारी स्थाळाची निवड मुद्दाम करण्यात आली आहे. सुधीर राऊत म्हणाले, कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती इ्स्टिटट्युट ऑफ इंडियन इंटिरीयर डिझायनर्स संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रताप जाधव यांची असणार आहे. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गड अभ्यासक डॉ. अमर आडके करणार आहेत.
वास्तु-पर्व पुस्तकाचे प्रकाशन :दरम्यान कार्यक्रमावेळी या दोन्ही संस्थांचे जेष्ट सभासद व माजी अध्यक्ष मोहन वायचळ लिखीत वास्तु-पर्व या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. या पुस्तकामध्ये ऐतिहासीक वास्तु निर्मीती, बांधणी,शैली याबाबत माहिती आहे. ४५ लेखांचे २७० पानांचे हे पुस्तक या क्षेत्रातील तरुणांना उपयोगी पडणार आहे.
या पत्रकार परिषदेला किशोर पाटील, मोहन ढवळे, बाजीराव भोसले, चंदन मिरजकर, प्रसाद मुजुमदार, मिलींद नाईक, राज डोंगरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply