
कोल्हापूर :- भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी वर्गाच्या सर्वांगीण विकासातच देशाची प्रगती अवलंबून आहे . त्यासाठीच येत्या २०२२ साला पर्यंत अर्थात देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी शेतकरी राजाचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे असे आग्रही मत केंद्रीय मंत्री सुदर्शन भगत यांनी व्यक्त केले. सिद्धगिरी कारागीर महोत्सवाच्या आजच्या महाशिवरात्री दिनी कारागीर महोत्सवात भाविकांच्या आलोट गर्दीत ज्ञानदूत आणि आरोग्य मंत्राचे प्रकाशन झाले.
आज महाशिवरात्री दिनी सकाळी पहाटे ५:३० वाजता काकड आरती व विधिवत पूजनाने सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी केंद्रीय मंत्री सुदर्शन भगत , प पु अदृश्य काद्सिद्धेस्वर स्वामीजी , स्वामी विद्नान्दजी सह मान्यवर व स्वामी गण यावेळी उपस्थित होते.
यानंतर केंद्रीय मंत्री सुदर्शन भगत कार्यकर्त्या समावेत सिद्धगिरी कारागीर महोत्सवाच्या प्रदर्शनात आले. तेथे त्यांनी कलाकारांनी निर्माण केलेल्या विविध कलात्मक वस्तूंची निर्मिती सह माहिती घेतली.
यानंतर मुख्य सभाग्रहात मार्गदर्शन करताना भगत यांनी स्वतंत्र प्राप्ती नंतरच्या देश प्रगतीचा आढावा गेतला . शेती व ग्रामीण परंपरागत उद्योगाकडे झालेले दुर्लक्ष हे फार चिंतनीय असल्याचे सागत हि चूक वेळी सुधारली पाहिजे असे आग्रहाने नमूद केले .आश्रम शाळा संस्कृती मधूनच आपण आदिवासी युवक ते केंद्रीय मंत्री अशी प्रगती केल्याचे सागत त्यांनी वाल्मीकी आणि सबरी माता असे आदिवासी युवक युवतीसाठी आश्रम शाळा सुरु करत असल्याचेही त्यांनी घोषित केले.
प्रारंभी सर्वांचे स्वागत करताना प पु अदृश्य काद्सिद्धेस्वर स्वामीजी यांनी सिद्दगिरी मठ परंपरेचा सविस्तर आधावा घेत सेंद्रिय शेती , गोपालन , गुरुकुल ते आताचे कारागीर ज्ञानपीठ या उपक्रमाकडून समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गाव तालुका पटली पर्यंत त्याचे अनुकरण होऊन समाजाला नवा आत्मविश्वास येण्यासाठी सर्व भाविकांची जबाबदारी वाढलेली आहे ती त्यांनी तन मन धन पूर्वक वेळ देऊन पूर्ण करावी अशी प्रेमळ साद हि त्यांनी तमाम भाविकांना घातली .यावेळी पाहुण्यांच्या हस्ते ज्ञानदूत मासिकाचे विजय कदम , मुक्ता दाभोलकर , विवेक सिद्ध यांच्या सह आरोग्य मंत्राचे संपादक डॉ सौ श्री चंद्रशेखर – रुपाश्री सिद्धापुरे, डॉ दत्ता निकम , डॉ सचिन पाटील यांचा पाहुण्ण्याच्या हस्ते यांचा स्मुतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी माजी मंत्री अण्णा डांगे , S B I चे राजेश आयदे , समन्वयक बसंतकुमारसिह्जी यांच्या सह मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र गोव्यासह कर्नाटकातून आलेल्या लाखो भाविकांची रात्री उशिरापर्यंत गर्दी होती .
Leave a Reply