‘राष्ट्र’मध्ये घोंघावणार विक्रम गोखेलरूपी भगवं वादळ

 

काही कलाकार विशिष्ट प्रकारच्या भूमिकांमुळे स्मरणात राहतात, तर काही भूमिका कलाकारांमुळे अजरामर होतात. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनय कौशल्याचा ठसा उमटविण्यात यशस्वी ठरलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही भारतीय सिनेसृष्टीत आपलं वेगवं स्थान निर्माण केलं आहे. याच कारणामुळे गोखले जेव्हा एखाद्या चित्रपटात दिसणार असतात, तेव्हा त्यांच्या चाहत्यांसोबतच सर्वांच्या नजरा त्या चित्रपटावर खिळतात. लवकरच ते ‘राष्ट्र’ या आगामी मराठी सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

निर्माते बंटी सिंग यांनी इंदर इंटरनॅशनलच्या बॅनरखाली ‘राष्ट्र’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच लेखन आणि संकलनाची जबाबदारी इंदरपाल सिंग यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. प्रथमच मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करताना इंदरपाल यांनी महाराष्ट्राच्या मातीतील कथानकाची निवड केली आहे. इथल्या लाल मातीच्या राजकारणातील बारकावे अभ्यासपूर्ण शैलीत मांडत त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाचा अचूक वेध घेतला आहे. रुपेरी पडद्याच्या पटावर राजकारणाच्या बुद्धीबवाचा डाव यशस्वीपणे मांडण्यासाठी इंदरपाल यांनी मराठीतील तगड्या कलाकारांची निवड केली आहे. त्यामुळे कागदावर उतरवलेलं कथानक पडद्यावर चितारणं इंदरपाल यांना सोपं गेलं आहे.‘राष्ट्र’चा विषय खूप वेगळा आणि वर्तमान परिस्थितीवर भाष्य करणारा असल्याने त्याला न्याय देण्यासाठी दिग्गज कलाकारांची निवड केली जाणं ही कथानकाची गरज असल्याने मराठीतील नामवंत कलाकारांना निवडण्यात आल्याचं इंदरपाल म्हणतात. विक्रम गोखले हे‘राष्ट्र’मधील हुकूमी एक्का आहेत. विक्रम गोखलेंनीही आपल्या व्यक्तिरेखेत जीव ओतला आहे. या व्यक्तिरेखेसाठी विक्रम गोखले हीच आमची पहिली आणि अखेरची पसंती होती असं निर्माते बंटी सिंग यांचं म्हणणं आहे. कथा ऐकताच गोखलेंनी होकार दिल्याने कुठेही अडचण न आल्याचंही बंटी सांगतात. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामधील आतापयर्तचा हा सर्वांत बिग बजेट चित्रपट असल्याचे निर्माते बंटी सिंग यांचे म्हणणे असून २०१८ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!