दुर्ग लिंगाणावर होणार शिवजयंती साजरी

 

कोल्हापूर : गडकोट, डोंगरदर्‍या, अरण्ये यांची भटकंती आणि संवर्धन करणारे मैत्रेय प्रतिष्ठान. या मार्फत (18 ते 19) रोजी, शिवजंयती विशेष दुर्ग लिंगाणा मोहिमीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. अमर अडके यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

 यावेळी ते म्हणाले,‘सशक्त आणि चारित्र्यवान तरुण हे राष्ट्ाचे बलस्थान असून गडकोट भटकंतीव्दारे एक सक्षम तरुणाई निर्माण व्हावी‘ या हेतूने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून,  (दि.18) रोजी रायलिंग पठार परिसरात दिवसभर पदभ्रमंती करुन सायंकाळी येथील वाडया वस्त्यांमध्ये राहणार्‍या लोकांना गरजू वस्तूच वाटप केल जाणार आहे. तसेच त्या ठिकाणी सांस्कृत कार्यक्रमांचही आयोजन करण्यात आल आहे. तसेच (दि.19) रोजी आव्हानात्मक मानला जाणारा दुर्ग लिंगाणा हा दोराच्या सहाय्याने चढून रायगड, तोरणा, राजगड या गिरी दुर्गाच्या साक्षीने दुर्ग लिंगाणाच्या दुर्गमाथ्यावर शिवरायांना वंदन करुन शिवजयंती साजरी केली जाणार आहे. हिमालय, सहयाद्री अशा यशस्वी मोहिमा ज्यांनी सर केल्या आहेत. अशा निवडक 28 जणांचा यामध्ये सहभाग असल्याचही त्यांनी सांगितल.

 तसेच गडकोटकडे युवकांचा वाढता कल लक्षात घेउन त्यांना शास्त्रसुध्दपध्दतीने गडकिल्याचे प्रशिक्षण, गिर्यारोहणाचे शास्त्र, आणि तंत्र यांच्या  प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन मे महिन्यात करण्यात येणार असल्याचही यावेळी त्यांनी सांगितले.

  यावेळी, डॉ. विश्‍वनाथ भोसले, सी. जे. गुरुगडे, प्रकाश कुुंभार, राजेश पाटील, विक्रम कुलकर्णी आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!