
कोल्हापूर: सर्किट बेंचबाबत सर्व बाबींची पूर्तता करणेचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिष्टमंडळाला दिले. ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचे नेतृत्वाखाली व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेसोबत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांची भेट घेतली.प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पूर्ण माहीती दिलेवर मुख्यमंत्री यांनी मुंबई उच्च न्यायालयात नवीन मुख्य न्यायाधीश हजर झालेवर त्यांची भेट घेवून कोल्हापूरात सर्कीट बेंच स्थापऩ करणेसाठी सर्व बाबींची पूर्तता करणेस शासन तयार असलेबाबत व सर्किट बेंच कोल्हापूरात स्थापन करणेसाठी उच्च न्यायालयाने मागणी केलेले पत्र त्वरित देतो असे सांगितले.तसेच शेंडा पार्क येथील 75 एकर जागा सर्कीट बेंचसाठी देणेबाबत पुढील कार्यवाही करणेबाबत जिल्हाधिकारी यांना पत्र पाठविणेबाबत विधी व न्याय खात्याच्या सचिवांना आदेश दिले. व सर्कीट बेंचसाठी अर्थसंकल्पात 100 कोटीची ठोक तरतूद करणेचे आश्वासन दिले. अर्धा तासाच्या बैठकीत मुख्यमंत्री यांनी सर्कीट बेंच कोल्हापूरातच व्हावे ही शासनाची इच्छा असलेचे स्पष्ट केले.
Leave a Reply