
कोल्हापूर: सबका साथ सबका विकास अशी घोषणा देऊन कृतीशील पणे कार्यरत असलेले आणि सामान्य जनतेच्या सामुहिक शक्तीची नेमकी जाण असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिद्दगिरी मठातून निश्चितपणे उत्साह वाढवणारे विविध उपक्रम मिळतील त्यासाठीच आपण लवकरच त्यांना सिद्दगिरी मठात येण्याचे आग्रही आमंत्रण देणार आहोत. असे टाळ्यांच्या गजरात माजी खा. राम मंदिर न्यास कमिटीचे अधक्ष पूज्य पाद स्वामी रामविलास वेदांती यांनी जाहीर केले.
गोरक्षण हे आताचे आंदोलन भविष्यत देशी गायीचे महत्त्व समजल्यावर प्रत्येक भारतीयाच्या जगण्याचा श्वास होईल. असा विस्वासही स्वामी रामविलास वेदांती यांनी व्यक्त करत सर्वांनी गो रक्षण आणि सेंद्रिय शेती झोकून देऊन भारताला महासत्ता बनवावे.असे आह्वान हि त्यांनी शेवटी केले.या दोघांचा सत्कार स्मृती चिह्न देऊन प पु अदृश काडसि९द्धेस्वर स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील विविध दिग्जानी सिद्धगिरी मठाकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व भक्तगण झोकून देऊन कार्यरत राहतील असा विस्वास व्यक्त केला . यावेळी श्रीरंग पाठ्न्म येथील शिव रुद्र स्वामीजी सह माजी मंत्री आण्णा डांगे सह मान्यवर उपस्थित होते .
आज गुरुवारी प्रदर्शना चा शेवटचा दिवस
गेली चार दिवस सिद्दगिरी कणेरी मठ येथे सुरु असलेल्या या सिद्दगिरी कारागीर महाकुंभ मध्ये महाराष्ट्र गोवा राज्यातील तसेच कर्नाटकातील शेतकरी , भक्तगण , जाणकारांनी विक्रमी साडे सात लाख हून आधिक संख्येने भेट दिली. गुरुवार १५ फेब्रुवारी हा या प्रदर्शन चा शेवटचा दिवस असणार आहे .
Leave a Reply