
कणेरी : गेले पाच दिवस अभूतपूर्व गर्दीत सुरु असलेल्या सिद्धगिरी कारागीर महाकुंभ ची आज सांगता झाली. या मध्ये महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यासह झारखंड, गुजरात आणि दिल्ली येथून आलेल्या साडे आठ लाख प्रेक्षकांनी विक्रमी संख्येने भेट दिली.
या पाच दिवसात महाराष्ट्रातील कोकण , विदर्भ ते गडचिरोली येथून आलेल्या कारागीरां सह इतर आकरा राज्यातून आलेल्या पाचशे हून अधिक कारागिरांनी आपल्या परंपरागत कलेच्या विविध कलात्मक वस्तूंचे १०० हून अधिक दालनात सादरीकरण केले . आजच्या समारोपाच्या सत्रात आमदार सुरेश हळवणकर आणि प . पु काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते स्मुर्ती चिन्ह देऊन व भगवा फेटा बांधून त्यांना गौरविण्यात आले.या वेळी माजी मंत्री आण्णा डांगे , राम मंदिर न्यास समितीचे पूज्यपाद स्वामी रामविलास वेदांतीजी, प्रकाश कोंडेकर , शंकर पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.कारागीरांच्या १०० दालनासह एकूण २०० दालनातून या पाच दिवसात तीन कोटी रुपयाची विक्रमी उलाढाल झाली. या सह सुरु करण्यात आलेल्या सिद्धगिरी कारागीर ज्ञानपीठात प्रशिक्षण घेण्यासाठी विविध जिल्हातील ३२०० युवक युवतीने आपली नाव नोंदणी केलेली आहे.
सिद्धगिरी कारागीर ज्ञानपीठ हि आगामी काळातील स्वतंत्र पूर्व काळात असणाऱ्या भक्कम स्वयंपूर्ण खेडेगावाची कृतीशील पाउल वाट आहे. भविष्यात त्याचा महामार्ग होऊन देश नकीच महासत्ता बनेल असा विश्वास आमदार सुरेश हळवणकर यांनी व्यक्त केला.
प . पु काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी या कारागीर ज्ञानपीठाने सिद्धगीरीची आणखी एक विधायक ओळख होऊन तमाम भक्त गणांची जबाबदारी वाढल्याचे आपल्या हितगुजपर समारोपात सांगितले. पाच दिवसाच्या या सोहळ्याचा आढावा घेत आर . डी शिंदे यांनी सव्वाशे हून अधिक देशी गायींचे प्रदर्शन आणि स्पर्धा, गुरुकुल च्या विद्यार्थांचे आणि कणेरी ग्रामस्थांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम, कोकणी दशा वतार आणि कटपुतली यांचे सादरीकरण करण्यात आले. विविध एकवीस कमिटीतून दोन हजारहून अधिक कार्यकर्ते या ठिकाणी यशस्विते साठी अहोरात्र राबल्याचे नमूद केले.
या पाच दिवसात सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर च्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण नाईक यांच्या मार्गदर्शना खाली. उभारण्यात आलेल्या दालनास हजारो नागरिकांनी विविध सेवांची माहिती घेतली. यामध्ये ९२० रुग्णांना बाह्यरुग्ण म्हणून तर ४५ जणांना आंतररुग्ण म्हणून मोफत सेवा देण्यात आली. तसेच आयुर्वेद विभागाच्या खास मधुमेही रुग्णांसाठी संशोधनातून तयार केलेल्या खाद्य पदार्थ दालनास अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. तसेच सिद्धगिरी मठाचे मुखपत्र असलेल्या ज्ञानदूत अंकाच्या १७५ पानी गुरुकुल विशेष एकाचीही विक्रमी संख्येने विक्री झाली. तर पाच दिवस पाच दिवस अखंड महाप्रसादाचा हि सर्वांनी लाभ घेतला. एकंदरीत साडे तेराशे वर्षाची परंपरा असलेल्या सिद्धगिरी मठाची देश आणि राज्य पातळीवर अधिक व्यापक प्रतिमा निर्माण करण्यात हा कारागीर महाकुंभ सोहळा यशस्वी झाला.
Leave a Reply