
कोल्हापूर: संपुर्ण देशाचे अक्षय उर्जास्थान असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथे भव्यप्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून दिल्ली येथे पार पडणारा महाराष्ट्र सदनातील शिवजन्मोत्सव सोहळा, राजपथावरील शोभायात्रा, सांस्कृतिक व मर्दानी खेळ व शिवचरित्रावरील महानाट्य संपूर्ण देशाचे लक्ष निश्चितच वेधून घेईल. विशेष म्हणजे आयोजित केलेल्या या सोहळ्यास देशातील हजारो शिवभक्तांसहीत देशाच्या सेनादलांचे सर्वोच्च प्रमुख महामहिम राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, नौसेना प्रमुख अँडमिरल सुनील लांबा व कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज विशेष उपस्थित राहणार आहेत.
शिवरायांनी प्रभावी लष्कर व आरमार स्थापन करुन आदर्श युद्धनिती घालून दिली. शिवरायांच्या देशाच्या राजधानीत साजरा होत असलेल्या जन्मोत्सवास देशाचे सर्वोच्च सेनाप्रमुख असलेले राष्ट्रपती महोदय, स्थलसेना प्रमुख व नौसेना प्रमुख उपस्थिती लावत आहेत, हे प्रथमच घडून येत आहे.
Leave a Reply