
कोल्हापूर : महाराष्ट्र शासन,डिपार्टमेंट ऑफ स्पोर्टस वेलफेअर ,युथ वेलफेअर यांच्याशी महाराष्ट्र स्टेटस लॉन टेनिस असोसिएशनचा करार होऊन कोल्हापूर च्या क्रिडा संकुलमधील टेनिस स्पोर्टसचे नुतनीकरण करण्यात आले आहे.नुतनीकरणानंतर याठिकाणी महाराष्ट्र स्टेट लॉन असोसिएशनतर्फे १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान सिनियर इंटरझोन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विभागीय क्रिडा संकुल जयप्रभा स्टुडिओ येथे या टेनिसच्या स्पर्धा होत असून कोल्हापूरमध्ये टेनिसचे वेगळे महत्व आता येणार मुलांना सरावासाठी व खेळण्यासाठी आणि शिकण्यासाठी याठिकाणी महाराष्ट्र स्टेटस लॉन टेनिस असोसिएशनमार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असे असोसिएशनचे कौन्सिलर श्री.शितल भोसले यांनी सांगितले आहे.
कोल्हापूरमध्ये होणार्या या स्पर्धेत महाराष्ट्राचे पाच झोन करण्यात आले आहेत.त्या पाचही झोनचे ४० निवडक स्पर्धक या टेनिसच्या सामन्यात सहभागी होत आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री.अविनाश सुभेदार यांच्या हस्ते शिनिवारी सकाळी ९ वाजता विभागीय क्रिडा संकुल येथे होणार आहे.१८ आणि १९ रोजी टेनिस सामने होणार आहेत.यामध्ये विजयी स्पर्धकांना पुढील फेरीत मुंबई व पुणे संघाबरोबर खेळण्याची संधी मिळणार आहे असे महाराष्ट्र स्टेटस लॉन टेनिस असोसिएशनचे कौन्सिलर शितल भोसले यांनी सांगितले आहे. तरी या स्पर्धेचा लाभ खेळाडूंनी व कोल्हापूरकरांनी घ्यावा असे आवाहन शितल भोसले यांनी केले आहे.
Leave a Reply