
कोल्हापूर : कोल्हापूर: वैद्यकीय शिक्षणात व्यवस्थापन हा विषय कधीच शिकवला जात नाही किंवा अभ्यासला जात नाही. एखादे हॉस्पिटल उभे करताना हॉस्पिटल बांधकामापासून त्यांची दुरुस्ती मशिनरी खरेदी व वैद्यकिय सेवा उपलब्धता यासंदर्भात येणाऱ्या अडचणी, सहकार्यांचे सहकार्य, कर्मचारी व्यवस्थापन,अग्निशमन व्यवस्थापन, वैद्यकीय विमा आणि दिवसेंदिवस नवीन येऊ घातलेले कायदे आणि समाजाच्या वैद्यकीय व्यावसायिकांकडून वाढत चाललेल्या अपेक्षा अशा अनेक गोष्टींची संलग्न राहावे लागते. तसेच गुणवत्ता प्रमाणपत्र, वैद्यकीय कचरा निर्मूलन वैद्यकिय जल व प्रदूषण व्यवस्थापन,इन्फेक्शन कंट्रोल हॉस्पिटल सेवा, वैद्यकीय परवाने या गोष्टीची माहिती कोणत्याही मेडिकल कॉलेजमधून किंवा याचे ज्ञान अनुभव दिला जात नसल्याने त्यातच वैद्यकीय कायदे , न्याय वैद्यकीय संदर्भ, ग्राहक कायदे याबाबत जागरूक राहावे लागते. याचा विचार करून कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने हॉस्पिकॉन 2018 या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.रविंद्र शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सदर परिषद निरंतर वैद्यकीय शिक्षण अंतर्गत असलेने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मुंबई यांनी याला चार गुण दिलेले आहेत असेच मानत सचिव डॉ संदिप साळोखे यांनी सांगितले. ही परिषद 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी रेसिडेन्सी क्लब येथे संपन्न होणार आहे.
कोल्हापूरातील वैद्यकीय सेवा सुविधांमध्ये दिवसेंदिवस प्रगती होत आहे. केवळ कोल्हापूर शहर व परिसरच नव्हे तर कोकण कर्नाटकातून पेशंटचा कोल्हापूरकडे येण्याचा उद्देश म्हणजे इथे असणारे अद्ययावत वैद्यकीय सुविधा व तज्ञ डॉक्टर्स यामुळे कोल्हापूरला आता ‘मेडिकल हब’ म्हटले जाते.
मुख्य:त वैद्यकीय पेशा हा बुद्धिजीवी लोकांचा पेशा, परंतु तो आवश्यक सेवेत येत असलेने समाजभिमुख आहे. ‘डॉक्टर्स आणि पेशंट’ परिणामी समाज हे एक अतुट नाते आहे. डॉक्टरांना रुग्णांचे योग्य निदान व तद्नंतर उपचार करताना कोणत व काय काय गोष्टींचा विचार करावा लागतो? कोणती नैतिक बंधने पाळावी लागतात? कोणत्या समस्या उद्भवतात? हे खरोखरच विचार कराला लावणारी गोष्ट आहे व याविषयी समाज अनभिज्ञ आहे.या सर्व विषयावर या परिषदेत चर्चा होणार आहे.
पत्रकार परिषदेला डॉ. दिपक जोशी,डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. अमर आडके,डॉ. अशोक जाधव ,डॉ. गीता पिलई,डॉ. नीता नरके यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी आणि संचालक उपस्थित होते.
Leave a Reply