
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीन 1 कोटी रुपयाचा धनादेश न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे आज सुपूर्द केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात आमदार अमल महाडिक, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, न्यासाचे कोषाध्यक्ष सुमंत भार्गव घैसास, विश्वस्त सर्वश्री गोपाळ रघुनाथ दळवी, संजय हरीचंद्र सावंत, विशाखा शरद राऊत,. पंकज यशवंत गोरे, सुबोध शरद आचार्य, वैभवी विजय चव्हाण व उप कार्यकारी अधिकारी रवि जाधव, कोल्हापूर महानगरपालिकेचे परिवहन सभापती राहूल चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव, संजय पवार, नियाज खान, प्रज्ञा उत्तुरे आदि मान्यवर उपस्थित होते.
श्रीसिध्दिविनायक न्यासाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या 1 कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यामुळे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामास अधिकगती मिळेल असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी बोलताना न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर म्हणाले, श्रीसिध्दिविनायक न्यासाकडून यापूर्वी महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांना 67 कोटी 50 लाखाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियांच्या कामास गती मिळाली आहे.
या निधीमधून करण्यात आलेल्या विविध जलसंर्वधनाच्या कामांमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पाण्याची साठवणूक झाली आहे. याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे.
या अभियानांतर्गत शिल्लक असलेली कामे पूर्ण करण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर व गडचिरोली या 7 जिल्ह्यांना प्रत्येकी 1 कोटी याप्रमाणे 7 कोटी एवढा निधी न्यासाकडून देण्यात येत आहे. आतापर्यंत न्यासाच्यावतीने जलयुक्त अभियांनास रुपये 74 कोटी 50 लाख इतका निधी मंजुर करण्यात आला आहे.
Leave a Reply