
कोल्हापूर: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली.त्या घटनेप्रमाणेच राज्यकारभार केला पाहिजे.घटनेत बदल करणे ही आत्महत्या ठरेल असे पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच सांगितले.यावर आत्महत्या करणे हा गुन्हाच आहे.असे परखड विचार प्राध्यापक डॉ.जी.पी.माळी यांनी मांडले.महापालिकेतील झाडू कामगार विजय शिंदे यांनी लिहिलेल्या जयभीम गीत धारा भाग-११ या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळयात ते बोलत होते.त्यांच्या हस्ते या पूस्तकाचे प्रकाशन झाले.महापालिकेतील झाडू कामगार कविता करतो.ही एक क्रांती आहे.या कविता संग्रहातील प्रत्येक कवितेतून समाजाला जागे करण्याची व नवी दिशा देण्याची क्षमता आहे.डॉ.आंबेडकर यांनी घटना लिहून भारताचे ऐक्य टिकवले.सर्व समाजाला एकत्रित आणण्याची भावना,कोल्हापूरातील प्रश्न कवितेच्या माध्यमातून मांडले आहे.या कविता वाचताना कार्ल मार्क्स,संत तुकाराम यांची आठवण येते.असे उद्गार डॉ.माळी यांनी काढले.यावेळी शाहीर शहाजी माळी,बाळासाहेब भोसले,डॉ.महादेव माने,वसंतराव मोळीक,बबनराव रानगे उपस्थित होते.
Leave a Reply