मैफिलीला लाभली दातृत्वाची किनार ..                                     

 
कोल्हापूर:  येथील प्रतिज्ञा नाट्यरंग तर्फे १० व ११ मार्च रोजी हॉटेल झोरबा येथील आनंद हॉल मध्ये अभंगवाणी ही भक्तीगीत व अभंगाची तसेच दिलरुबा मधुर हा . ही नाट्यगीतांची मैफिल घेण्यात  आली यावेळी जमा झालेली  रक्कम गरजुंना देण्यात आली दिनांक १० मार्च रोजी स्वरानंद संगीत वाद्यवृंद यांनी श्री राम जय राम ,सुंदर ते ध्यान ,विठू माऊली , आनंदाचे डोही आनंद तरंग ..विठ्ठल आवडी यासारख्या भक्तिगीते सादर केली .श्रीधर सुतार व वसुधा लिंग्रज यांच्या गायकीने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले . नितेश जोशी यांच्या बहारदार निवेदनाने मैफिलीला रंगत आणली . तबल्यावर अभिजित पाटील ,पखवाजीला विश्वजीत चौगुले होते . संवादिनीला रामचंद्र लोहार ,तानपुरा साथ ऋषिकेश सुतार ,मंजिरी दत्तात्रय सुतार तर कि बोर्ड साथ शिवाजी सुतार यांनी केली . 
                                  दिनांक ११ मार्च रोजी स्वरसाज छोटा गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वरविलास संगीत मंडळाने दिलरुबा मधुर हा …. ही नाट्यगीतांची  मैफिल सादर केली . गेली  पंचवीस वर्षे आपल्या घरामध्ये संगीत साधना करणाऱ्या श्रीकृष्ण लाटकर ,रामराजा लाटकर ,विभावरी सोनटक्के ,नीला नागावकर यांनी संगीत सौभद्र ,संगीत स्वयंवर ,संगीत शारदा ,संगीत संशयकल्लोळ ,संगीत मानांपमान या अभिजात नाटकांमधील नाट्यपद सादर केली . दिलरुबा मधुर हा सोबत अंगणी पारिजात फुलला ,कोण ही सुंदरा यदुवरा ,प्रिय पहा … अशा नाट्यपदांनी रसिकांची मने जिंकली . किती गोड गाऊ मी रसिका या भैरवीने मैफिलीची सांगता झाली . तर संपूर्ण मैफिलीलाj माहेश्वरी गोखले यांच्या गोड वाणीसोबत अर्थपूर्ण निवेदनाने बहर आला . ऑर्गन साथ डॉ ज.ल.नागवकर ,हार्मोनियम साथ प्रभाकर लाटकर तर तबला साथ अरविंद लाटकर यांनी केली . 
                                  या दोन्ही मैफिलीतून जमा झालेला निधी मोहम्मद गौस व पांडुरंग कांबळे यांच्या उपचारासाठी कलाकारांच्या हस्ते देण्यात आला . 
रमेश सुतार यांनी ध्वनी संयोजन व रोहन घोरपडे यांनी प्रकाशयोजना केली मिलिंद अष्टेकर व सागर भोसले यांनी नेपथ्य केलं तर संजय जोग यांनी सूत्रधार म्हणून काम केले . प्रशांत जोशी ,प्रतीक्षा लोंढे ,प्रदीप कुंभार ,शंकर नायडू व राजेंद्र चौगुले यांनी संयोजन केले .  या दोन्ही मैफिलींना बाळासाहेब कदम ,नाना बोरगावकर ,पुष्कर बोरगावकर यांचे विशेष सहकार्य मिळाले . 
यावेळी प्रतिज्ञाचे सुधीर अलगौडर ,नितीन कुलकर्णी,संजीवनी दीक्षित ,प्रवीणभाई लिंबड यांच्या सह प्रतिज्ञाचे सभासद व जाणकार रसिक वर्ग उपस्थित होता . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!