
आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला अभिनेता आता पुन्हा स्टारप्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या नव्या मालिकेत दिसणार आहे. यामालिकेत पिळदार मिशी असलेल्या रांगड्या लुकमध्ये ‘श्रीधर’ हीव्यक्तिरेखा साकारत आहे. आपल्या व्यक्तिरेखेवर नेहमीच मेहनतघेणाऱ्या अक्षरनं ‘छोटी मालकीण’साठीही खास मेहनत घेतली आहे.
स्टार प्रवाहबरोबर अक्षर कोठारीचं जुनं नातं आहे. त्यानं स्टारप्रवाहच्याच ‘हे बंध रेशमाचे’ या मालिकेतून पदार्पण केलं होतं. त्यानंतर’आराधना’ या मालिकेतही काम केलं होतं. या दोन्ही मालिकांनी त्यालाउत्तम अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली. ‘छोटी मालकीण’ यामालिकेद्वारे अक्षर स्टार प्रवाहवर पुनरागमन करत आहे. यापुनरागमनामुळे अक्षरच्या मनात परदेशात शिकून आपल्या घरीपरतलेल्या मुलासारखी भावना आहे.
‘श्रीधर’ या व्यक्तिरेखेविषयी अक्षर म्हणाला, “माझी प्रत्येक भूमिकावेगळी दिसावी यासाठी मी लुकवर विचार करतो, मेहनत घेतो. सुदैवानंआतापर्यंत माझा विचार योग्य ठरला आहे. ‘छोटी मालकीण’ मालिकेचीकथा माझ्याकडे आली. त्यातली ‘श्रीधर’ ही व्यक्तिरेखा वाचल्यावरमाझ्या मनात काही चित्र तयार झालं. त्यात या श्रीधरला पिळदार मिशीअसावी असं वाटत होतं. हा ‘श्रीधर’ छोट्या शहरातला तरूण आहे. मीही सोलापुरसारख्या शहरातला असल्यानं श्रीधरच्या मानसिकतेचानेमक्या पद्धतीनं विचार करू शकलो. त्यामुळे मी मिशी पिळदारहोण्यासाठी प्रयत्न केले. माझा लुक पाहिल्यावर श्रीधरला पिळदारमिशी असावी ही माझी कल्पना स्टार प्रवाहनंही मान्य केली.’
“स्टार प्रवाहनं अभिनेता म्हणून पहिली संधी दिली होती. त्यामुळे माझंआणि स्टार प्रवाहचं नातं खूप आपलेपणाचं आहे. ‘छोटी मालकीण’ यामालिकेच्या निमित्तानं मला घरी परत आल्यासारखं वाटतंय. माझ्याआधीच्या ‘हे बंध रेशमाचे’ आणि ‘आराधना’ या मालिकांप्रमाणे याहीमालिकेवर प्रेक्षक नक्कीच प्रेम करतील याची मला खात्री आहे” असंहीअक्षरनं सांगितलं.
‘छोटी मालकीण’ आपल्या भेटीला येत आहे १९ मार्च पासून सोमवार तेशनिवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर!
Leave a Reply