

गेल्या वर्षीच्या स्पर्धा हंगामात कृष्णराज महाडिकनं इंग्लडमधील अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणार्या, बीआरडीसी फॉर्म्युला थ्री रेसिंग चॅम्पियनशिप मध्ये एक रेस जिंकून इतिहास रचला आहे. त्याची दखल एफ एम एस सी आय ने घेतली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी नोंदवल्याबद्दल कृष्णराजला विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. बी आर डी सी च्या हंगामाची तयारी सराव करण्यासाठी कृष्णराज इंग्लडमध्ये असल्यानं, त्याच्यावतीनं पृथ्वीराज महाडिकनं पुरस्कार स्विकारला. एफ एम एस सी आय अध्यक्ष अकबर इब्राहीम आणि न्यायाधिश एम एस रमेश यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी देश-विदेशातील रेसिंग जगतातील दिग्गज आणि मान्यवर उपस्थित होते. कृष्णराजच्या रूपानं मिळालेला हा पुरस्कार म्हणजे कोल्हापूरचा सन्मान आहे.
Leave a Reply