
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी १३ कोटी ४३ लाख आजतागायत खर्च झाले असून, मजबुत रस्ते बांधण्यासाठी ६८ लाख मंजूर करण्यात आले आहेत. रस्त्यासंदर्भात कोणतेही काम अपूर्ण राहणार नाही. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.यासंदर्भात सदस्य भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पाटील म्हणाले, रस्त्यांचे काम मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहेत. १४७ रस्ते हायब्रीट ॲन्युटी अंतर्गत करण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा काढल्या असून ८० निविदांना प्रतिसाद मिळाला आहे. अन्य चार ते पाच रस्त्यांच्या एकत्र निविदा काढण्यात येणार आहेत. एप्रिल महिन्यापर्यंत काम पूर्णत्वास नेण्यात येईल. पाटील म्हणाले, रस्ते दिर्घ काळ टिकावेत यासाठी विशिष्ट प्रकारच्या साहित्याचा वापर करून ते तयार करता येतील का, यासाठी अभ्यास करून निविदा तयार करण्यात आल्या आहेत. राज्यातील एकही रस्त्याचे काम अपूर्ण राहणार नाही, ईपीसी (इंजिनीअरींग, प्रोक्युरमेंट, ॲण्ड कन्स्ट्रक्शन) अंतर्गत सर्व रस्ते पूर्ण करू, असेही त्यांनी सांगितले.
Leave a Reply