नोकरीला रामराम करून एतशा संझगीरी झाली ‘छोटी मालकीण’

 

नाटक, चित्रपट, अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, चांगलीचाललेली नोकरी सोडून एक तरुणी अभिनेत्री होण्यासाठी धडपडकरते… तिचं नशीबही तिला साथ देतं… स्टार प्रवाहच्या ‘छोटीमालकीण’ या नव्या मालिकेत प्रमुख भूमिका करण्याची सुवर्ण संधीतिला मिळते आणि तिचं छोट्या पडद्यावर भव्य पदार्पणही होतं…

ही प्रेरणादायी कथा आहे ‘छोटी मालकीण’ एतशा संझगीरीची! स्टारप्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या नव्या मालिकेत एतशा ‘रेवती’ ही प्रमुखव्यक्तिरेखा साकारत आहे. एतशानं सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर ती नोकरीही करत होती. मात्र, नोकरीत काही मन रमत नव्हतं. कथकचं शिक्षण घेत असल्यानं परफॉर्मन्सची भीती वाटत नव्हती. अशातच तिच्या समोर संधी चालून आली ती एका सौंदर्य स्पर्धेची. त्याततिची अंतिम फेरीसाठी निवड झाली. तिला एक पुरस्कारही मिळालाआणि तिचं नशीब पालटलं. दशमी क्रिएशन्सनं तिला हेरलं आणि ‘छोटीमालकीण’ या नव्या मालिकेसाठी तिची निवड झाली. पहिल्याचमालिकेत तिला डॉ. गिरीश ओक, वंदना वाकनीस, अक्षर कोठारी, निखिल राजेशिर्के, प्रदीप पंडित, प्रतीक्षा जाधव, पूजा नायक अशाअनुभवी कलाकारांसह काम करण्याची संधी मिळाली आहे.

“माझ्यासाठी हा सगळाच प्रवास अद्भुत आहे. कारण, मलाअभिनयाची, नाटकाची, चित्रपटाची कसलीच पार्श्वभूमी नाही. घरीकुणीही या क्षेत्रात नाही. नोकरी करणारी मुलगी ते अभिनेत्री हा जेमतेमएका वर्षात घडलेला प्रवास आहे. या सगळ्यात माझ्या आई-वडिलांनीमला खूप खंबीर पाठिंबा दिला. आजपर्यंत स्टार प्रवाहच्या मालिकापहात होते. आता त्याच चॅनेलवर आपण दिसणार याचा आनंद खूपचप्रचंड आहे,’ असं एतशानं सांगितलं.

“छोटी मालकीण म्हणजेच ‘रेवती’ या व्यक्तिरेखेच्या काही छटामाझ्याशी मिळत्याजुळत्या आहेत. तसंच मालिकेची कथाही मला खूपआवडली. त्यामुळे ही मालिका करावीशी वाटली. अजून एक महत्त्वाचंकारण म्हणजे स्टार प्रवाह. स्टार प्रवाहनं कायमच नव्या कलाकारांनासंधी दिली आहे. पहिल्याच मालिकेत एवढ्या मोठ्या चॅनेलसह, डॉ. गिरीश ओक, वंदना वाकनीस, अक्षर कोठारी, अशा दिग्गजअभिनेत्यांबरोबर काम करण्याची संधी मिळणं स्वप्नवत आहे. मला हामहत्वपूर्ण ब्रेक दिल्यामुळे मी स्टार प्रवाहची ऋणी आहे. आमचीनिर्मिती संस्था दशमी क्रिएशन्सनंही मला सांभाळून घेतलं. मला खात्रीआहे, ‘छोटी मालकीण’ प्रेक्षकांना नक्की आवडेल.” असं एतशानंउत्साहाने सांगितलं.

मोठ्या घरातल्या लाडावलेल्या मुलीची गोष्ट असलेली ‘छोटी मालकीण’ ही मालिका १९ मार्चपासून नक्की पहा सोमवार ते शनिवार रात्री ९वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!