आ. राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून आठ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांची मदत

 

कोल्हापूर : आमदार राजेश क्षीरसागर यांची रुग्णसेवा गेली आठ वर्षे अविरतपणे सुरु आहे. दोन आठवड्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या परिसरातील दहा रुग्णांना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे आठ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली होती. त्याच पद्धतीने आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूरातील आठ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुपये पाच लाखांची मदत करण्यात आली आहे. काल युवासेनेच्या छत्रपती शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान येथे आयोजित कार्यक्रमात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत लाभार्थी रुग्णांना आर्थिक सहाय्यता निधी मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.
कोणतीही जाती– धर्म, मतदारसंघ न मानता सामाजिक बांधिलकीतून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार ८० % समाजकारण आणि २० % राजकारण या मुलमंत्राप्रमाणे ही रुग्णसेवा अविरत सुरु आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून उपचार करून घेणाऱ्या तसेच आर्थिक मदतीचा लाभ घेणाऱ्या रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांनाही मदत केली जाते. कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातून कोल्हापूर शहरामध्ये विविध आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याकरिता हजारो रुग्ण दाखल होत असतात. त्यातील बहुतांश रुग्ण हे सर्वसामान्य गरीब घरातील असतात. या रुग्णांना उपचारा अभावी परतावे लागू नये, त्यांना दिलासा मिळावा या सामाजिक भावनेतून आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने गेल्या सात वर्षामध्ये साडेआठ हजार रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करणेत आल्या आहेत. त्याचबरोबर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निधी मंजूर करून रुग्णांना आधार देण्याचे काम करण्यात आले आहे. अशाच आठ रुग्णांना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली. गेली आठ वर्षे सुरु असलेली रुग्णसेवा अशीच अविरतपणे सुरु ठेवून, सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्याचे काम यापुढेही करणार असल्याची ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी असुन, गरजू रुग्णांनी शिवसेना शहर कार्यालय शनिवार पेठ येथे संपर्क साधण्याचे आवाहनही आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आर्थिक मदत मंजूर झालेल्या रुग्णांना निधी पत्राचे वाटप करण्यात आले. यामध्ये शिवाजी पेठ येथील सौ. स्वाती संजय नाझरे याचे उपचारासाठी दोन लाख रुपये, संकपाळनगर, कसबा बावडा येथील सौ. अनुसया शांताराम शेवाळे यांचे कर्करोग आजारावरील उपचारासाठी ७५ हजार रुपये, घुणकी, ता. हातकणंगले येथील सौ. बेबीताई मारुती पाटील यांचे उपचारासाठी ५२ हजार ५०० रुपये, राजारामपुरी ६ वी गल्ली येथील श्रीमती सविता संजय माने यांचे हृदय आजारावरील उपचारासाठी ५० हजार रुपये, सौरभ विजय मोहिते यांचे उपचारासाठी ५० हजार रुपये, अतिग्रे माळ, कसबा बावडा येथील राजेंद्र सर्जेराव ठोंबरे यांचे कर्करोग उपचारासाठी २५ हजार रुपये, म्हाडा कॉलनी येथील सौ.विजयमाला अमरसिंह भोसले यांचे मेंदू आजारावरील उपचारासाठी २५ हजार रुपये, लक्ष्मीपुरी येथील सौ. रेश्मा इकबाल बागवान यांच्या उपचाराकरिता २० हजार रुपये आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.
यावेळी प.म. देवस्थान समिती कोशाध्याक्षा सौ. वैशाली क्षीरसागर, परिवहन सभापती श्री. राहुल चव्हाण, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, युवासेना संपर्कप्रमुख ऋषिकेश गुजर, चाटे स्कूलचे प्रा. भारत खराटे, युवासेनेचे ऋतुराज राजेश क्षीरसागर, पुष्कराज राजेश क्षीरसागर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्शल सुर्वे, शहरप्रमुख पियुष चव्हाण, अविनाश कामते, चेतन शिंदे, शिवसेनेचे जयवंत हारुगले, महिला आघाडीच्या शहर संघटक सौ. मंगल साळोखे आदी रुग्णाचे नातेवाईक आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!