कोल्हापूर: पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या पावन उपस्थितीत श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ येथे येत्या शनिवारी ३१ मार्च रोजी प्रतिवार्षीक भव्य निकाली कुस्ती जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र चॅम्पियन पै. विक्रम वडतीले विरूध्द हरियाणा राष्ट्रीय सुवर्ण पद विजेता पै. कुलदीप यादव यांच्यातील प्रथम क्रमांकाचा कुस्तीसामना रंगणार असून एकूण ६६ बहारदार कुस्त्यांचे सामने यावेळी होणार आहेत. मठाचे ४८ वे मठाधिपती ब्रह्मनिष्ठ जगद्गुरु काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त हे भव्य जंगी कुस्तीमैदान संपन्न होत आहे. यासाठी जोल्ले उद्योग समुह सिद्धगिरी नागरी पतसंस्था यांचे सहकार्य लाभले आहे. या मैदानात गंगवेष तालमीचा पै. महाराष्ट्र चॅम्पियन सिकंदर शेख विरूध्द हरियाणाचा विशालकुमार यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे. यासह ऋतुजा मुळीक ( पुणे ) , प्रतिक्षा बागडी ( सांगली ) , कोमल खरात , संजना बागडी या महीला कुस्तीगिरीच्या ही लढती होणार आहेत. यावेळी शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार विजेते चंद्रकांत चव्हाण यांचे विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यासह आघाडीचे मल्ल तानाजी कुऱ्हाडे , ऋषीकेष पाटील ( राशीवडे ) , प्रणव चौगुले ( कोगिल ) हे मल्लही पैलवानाशी लढणार आहेत. या कुस्तीचे निवेदन श्री राजाराम चौगुले ( खेबवडे ) , श्री कृष्णा चौगुले ( राशीवडे ) करणार असून हलगीवादन श्री हनुमंत घुले करणार आहेत. कुस्ती मैदान आखाड्याचे उद्घाटन पूज्य प्राणालिंग स्वामीजी ( विरुपाक्षलिंग समाधी मठ निपाणी) यांच्या हस्ते होणार आहे. तरी शनिवारी ३१ मार्च रोजी दुपारी ३ :०० वाजता सर्व क्रिडा कुस्ती शौकीनानी उपस्थित राहावे असे आवाहन सिद्धगिरीमठ परिवाराने केले आहे.
पुज्यश्री स्वामीजींचे विचार, कार्य, श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाचे उपक्रम,याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुढील पेजला भेट द्या : https://www.facebook.com/Siddhagiri.Kolhapur

Leave a Reply