
कोल्हापूर : मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काल संसदीय कार्यमंत्री नाम. गिरीश बापट यांनी, अधिवेशन कामकाजावरील बाब क्रमांक अकरा अ (६) अन्वये सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३३ श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर, हे विधेयक विधानसभेत मांडले. त्या अनुषंगाने आज संसदीय कार्य राज्यमंत्री नाम. रणजीत पाटील यांनी हे विधीयेक आज सभागृहात सादर केले. या विधेयकास उपस्थित सर्वच विधानसभा सदस्यांनी एकमताने सहमती दर्शवित श्री. अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबत विधेयक पास केले. पंढरपूरच्या धर्तीवर श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमावेत, यासह छत्रपती शाहू महाराजांनी सुरु केलेली शाहू वैदकीय पाठशाळा विशेष प्रयत्न करून जोमाने सुरु करावी, अशी मागणी या विधेयकाच्या माध्यमातून आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. दरम्यान, हे विधेयक मंजूर झाल्याचे समजताच शिवसेना शहर कार्यालय येथे शिवसैनिक आणि पदाधिकारी यांनी जमून साखर पेठे वाटून या निर्णयाचे स्वागत केले.या विधेयकाला पाठींबा देताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, विधेयकाप्रमाणे पुजार्यांचे उत्पनाचे हक्क व इतर हक्क संपूष्टात आणताना त्यांच्या नुकसान भरपाई साठी सरकार काही तरतूद करू इच्छिते, मात्र, यासंदर्भात छत्रपती शाहू महाराज यांनी मंदिराचे व्यवस्थापन आणि पुजार्यांचा हिस्सा याबाबत काही आदेश काढले असून, यासाठी वेगळी तरतूद स्पष्ट केली आहे. रुपये दहा च्या वरील सर्व रक्कम मंदिर व्यवस्थापनासाठी जमा करणे आवश्यक असताना पुजार्यांनी आजपर्यंत उंची साड्या, दाग-दागिने, रोख रक्कम यातून शेकडो कोटी रुपये जमा झाले असताना छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. याचा आधार घेऊन आणि मंदिरातील उत्पनावर त्यांनी आजपर्यंत मिळविलेल्या मालमत्तेची आयकर विभागाकडून माहिती घेऊन पुजाऱ्यांनी आजपर्यंत स्वतःकडे जमविलेली दाग-दागिने, रोकड यांची ३० दिवसात समितीकडे सुपूर्त करून त्यांच्या नुकसान भरपाई बाबत निर्णय घेण्यात यावा ते बोलताना पुढे म्हणाले कि, छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजातील मुलांच्या पूजा विधीतील शिक्षणासाठी शाहू वैदकीय शाळेची स्थापना केली. येथे शिकलेली मुले हि थेट लक्षरात पूजा विधी साठी भरती होतात. त्यांचाही पुजारी नेमणुकीसाठी प्राधान्याने विचार व्हावा. त्याचबरोबर सदर शिक्षणसंस्थेस शासनाने मदत करून पूजा विधीचे शिक्षण सुरु ठेवावे, अशी मागणी केली.यासह पुजार्यांची नेमणूक होत असताना राज्यस्तरीय परीक्षेच्या माध्यमातून पंढरपूरच्या धर्तीवर श्री रुक्मिणी मातेची पूजा करण्याकरिता महिला पुजार्यांची नेमणूक केली आहे त्याप्रमाणे आई श्री अंबाबाईच्या पूजेसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या पुजार्यांमध्ये ५० टक्के महिला पुजार्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती मध्ये झालेल्या घोटाळ्यांबाबत आपण लक्षवेधी उपस्थित केली असून, मा. मुख्यमंत्री महोदयांनी यास एसआयटी समिती नेमून चौकशी करण्याचे आश्वासन आपणास दिले. परंतु याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याचा देखील विचार करणेत यावा. त्याचबरोबर पुजार्यांचे वेतन ठरविताना सिद्धिविनायक, पंढरपूर आणि शिर्डी च्या धर्तीवरच वेतन श्रेणी ठरविण्याची मागणी केली. यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार हर्षवर्धन सकपाळ यांनी आपल्या सुचना मांडल्या. यानंतर संसदीय कार्य राज्यमंत्री ना. रणजीत पाटील यांनी हे विधेयक सभागृहापुढे सादर केले आणि यास सर्वच उपस्थित सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.दरम्यान शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोशाध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आणि शिवसेना प्रमुख पदाधिकारी, उपशहर प्रमुख, महिला आघाडी यांच्या हस्ते नागरिकांना साखर पेढे वाटप करून आनंदोस्त्व साजरा करण्यात आला.
Leave a Reply