
कोल्हापुर: लकी बझार समोरील स्माईल्स ऍन्ड पर्ल्स डेंटल क्लीनिकच्यावतीने शनिवार दि. ३१ मार्च रोजी विशेष दंत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. कोल्हापुरात ठिकठिकाणी सुरु असलेल्या खेळघर उपक्रमातील महिला प्रशिक्षिकांसाठी या मोफत शिबिराचे आयोजन केले आहे. डॉ. इला माटे यांच्याकडून या शिबिरात उपस्थित महिलांची दंत आणि मुख तपासणी केली जाणार आहे. लहान मुलांमध्ये दाताचे रोग वाढू नयेत, लहान वयातील मुलांच्या मौखिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबरोबरीने खेळघरातील महिला प्रशिक्षिकांना त्यांच्या दातांच्या सुरक्षेविषयी या शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे. दात घासण्यापासून ते अगदी दाढ किडू नये यासाठी शास्त्रशुद्ध माहिती देवून, खेळघरातील प्रशिक्षिकांमध्ये मौखिक आरोग्याबद्दल जनजागृती केली जाणार आहे. गेली ८ वर्ष दंतवैद्यक क्षेत्रात डॉ. ईला माटे कार्यरत असून, लहान मुलांच्या मौखिक आरोग्याचे रक्षण खेळघरातून व्हावे, त्यासाठी खेळघरातील ताईंना मुलभूत माहिती असावी, हा या शिबिराचा उद्देश आहे. शनिवार दि. ३१ मार्च रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत शाहू मिल रोडवरील, लकी बझार समोर, राजारामपुरी ७ वी गल्ली कॉर्नर, भोसले प्लाझा येथील स्माईल्स ऍन्ड पर्ल्स डेंटल क्लीनिक या ठिकाणी हे मोफत शिबीर आयोजित केले आहे. त्याचा लाभ कोल्हापूर शहरातील खेळघर चालवणार्या युवती-महिलांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply