ऐश्वर्या नारकर यांनी ‘लेक माझी लाडकी’च्या सेटवर केल्या नारळाच्या वड्या

 

मालिकांच्या सेटवर खूप गमतीजमती घडत असतात. स्टार प्रवाहची’लेक माझी लाडकी’ ही मालिकाही त्याला अपवाद नाही.’लेक माझीलाडकी’च्या सेटवर नुकतीच सगळ्यांना गोड मेजवानी मिळाली. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नारळाच्या वड्या करून सर्वांना गोडखाऊ करून दिला.

‘लेक माझी लाडकी’ मालिकेच्या सेटच्या परिसरात बरीच नारळाचीझाडं आहेत. नारळाच्या झाडांवरून नारळ काढण्यात आले. हेकाढलेले नारळ ऐश्वर्या नारकर यांनी पाहिले आणि त्यांना ओल्यानारळाच्या वड्या करायची कल्पना सुचली. ही कल्पना लगेचअंमलातही आली. त्यांच्या सुचनेनुसार सेटवरच नारळाच्या वड्या तयारझाल्या. या छान खमंग गोड वड्यांवर सेटवरच्या सर्वांनी ताव मारलानसता तर नवलच…अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या विषयी म्हणाल्या, “आम्ही सेटवर फावल्यावेळात बरीच धमाल करत असतो, खादाडी करत असतो. याआधीहीआम्ही मेथांबा, मिसळ असे बरेच पदार्थ केले आहेत. सेटवर नारळपाहून नारळाच्या वड्या करण्याची कल्पना सुचली आणि लगेचवड्याही केल्या. या वड्या करताना खूप मजा आली. ताज्या वड्याआम्ही सर्वांनी मिळून खाल्ल्या.”या लोकप्रिय मालिकेत मीरा आणि इरावती यांच्या आयुष्यात कायघडतंय हे जाणून घेण्यासाठी न चुकता पहा ‘लेक माझी लाडकी’ सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!