
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर.के. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक जब्बार पटेल यांना आज जाहीर करण्यात आला. येत्या १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता श्री. पटेल यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू (स्व.) प्राचार्य रा.कृ. कणबरकरयांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार निर्मितीसाठीत्यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाकडे २५ लाख रुपयांचीठेव प्रदान केली आहे. श्रीमती शालिनी कणबरकर यांच्यासमवेत झालेल्या सामंजस्य करारातून शिवाजीविद्यापीठाच्या या माजी कुलगुरूंच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘प्राचार्यआर.के. कणबरकर पुरस्कारा’ची संयुक्त निर्मिती करण्यातआली. देशातील शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक,सांस्कृतिक, क्रीडा तसेच अन्य क्षेत्रांत अत्युत्कृष्ट कामगिरीबजावणाऱ्या व्यक्तीला प्राचार्य कणबरकर यांच्या स्मृतिदिनीदरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. रुपये १ लाख ५१ हजार रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुपआहे. यापूर्वी प्रथम पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी.एन.आर. राव यांना तर गतवर्षी दुसरा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला प्रदान करण्यात आला. यंदा ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी पुरस्कारासंदर्भात अधिक माहिती देताना शोध समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील म्हणाले की, कुलगुरूंच्याअध्यक्षतेखालील शोध समितीने यंदा डॉ. जब्बार पटेल यांच्या भारतीय नाट्य-चित्रपट क्षेत्रातील योगदानाची आणि त्या माध्यमातून भारतीय समाजासाठी केलेल्या सेवेची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली. येत्या १३ एप्रिल २०१८ रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शोध समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. बी.ए. खोत, डॉ. भालबा विभुते, डॉ. एन.व्ही. चिटणीस, उपकुलसचिव विलास सोयम उपस्थित होते.
Leave a Reply