
मुंबई : ऑनलाईन मीडिया, न्यूज पोर्टल्स आणि तत्सम माहिती प्रसारित करणाऱ्या वेबसाईटवर नजर ठेवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दहा सदस्यीय समिती गठित केली आहे.ही समिती सरकारला ऑनलाईन मीडिया आणि न्यूज पोर्टलसाठी दिशानिर्देशक नियमावली तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे.
प्रिंट आणि टीव्ही मीडियाला लागू असणाऱ्या नियमावली सारखी नियमावली लागू करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. यात न्यूज वेबसाईट, डिजीटल प्रसारण सेवा, इन्फोटेन्मेंट इत्यादींचा समावेश असणार आहे. त्यामुळे ही समिती यापूर्वी माध्यमांसाठी जे नियम घालून देण्यात आले आहेत, त्यानुसार वेबसाईट्ससाठी नियम बनवणार आहेत.
Leave a Reply