भाजपा ३८ वा वर्धापनदिन जिल्हा कार्यालयात उत्साहात संपन्न

 

कोल्हापूर:भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्यावतीने आज सकाळी १० वाजता भाजपा जिल्हा कार्यालय बिंदू चौक येथे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष श्री महेश जाधव, जेष्ठ कार्यकर्ते प्र.द.गणपुले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा ३८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीच्या ध्वजास पुष्पहार घालून ध्वजारोहन करण्यात आले. संपूर्ण देशामध्ये पक्षाचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई येथे भाजपा कार्यकर्त्यांचा महामेळावा यानिमित्य आज होत असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अमित शहा सर्वांना संबोधित करणार आहेत. याच पाश्वूमीवर आज कोल्हापूरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष श्री महेश जाधव आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, संघटनात्मक स्तरावर काश्मीर पासून कन्या कुमारी पर्यंत आज भाजपा अत्यंत सशक्त व मजबूत पक्ष बनलेला आहे. ११ कोटी सदस्य संख्या असलेला जगातील एकमेव राजकीय पक्ष म्हणून नोंद झाली आहे. देशामध्ये १६ राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय व यशस्वी नेते ठरले आहेत.भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेच्या हितासाठी अधिकाधिक चांगले कार्य करणे अपेक्षित आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.नाम.देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री तथा कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्र व कोल्हापूरच्या विकासासाठी मोठे भरीव कार्य सुरु ठेवले आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता भाजपा मध्ये आमदार, खासदार, मंत्री आदी पदांवर कार्य करत आहे. कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात संघटन मजबूत करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे असे त्यांनी सांगितले.संघटन सरचिटणीस श्री अशोक देसाई यांनी वर्धापन दिनाचे महत्व सांगुन बूथ रचना तसेच आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जनतेच्या संपर्कात राहण्या संदर्भात सूचना केल्या.  सरचिटणीस संतोष भिवटे यांनी आभार व्यक्त केले.यावेळी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, वंदे मातरम, भारत माता कि जय अशा घोषणा दिल्या. यानंतर कार्यकर्त्यांना जिलेबीचे वाटप करण्यात आले.यावेळी सयाजी साळवेकर, गणेश देसाई, श्रीकांत घुंटे, राजाभाऊ कोतेकर, आशिष कपडेकर, रणजीत जाधव, अरविंद शिंदे, पारस पलीचा, रतन बाणदार, पुष्कर श्रीखंडे, प्रसाद मोहिते, विवेक पोळ, गुरुनाथ भूयेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!