
कोल्हापूर: अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूर च्या वतीने कोल्हापुरात 18 ते 21 ऑक्टोबर 2022 दरम्यान खुल्या महाराष्ट्र राज्य निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी हॉलमध्ये या स्पर्धा रंगणार आहेत.चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या नियमानुसार एकूण आठ फेरीमध्ये होणार आहेत.या स्पर्धेतील पहिल्या येणाऱ्या दहा क्रमांकांना एकूण रोख ५० हजार रुपये व चषक बक्षीस म्हणून ठेवले आहे. स्पर्धा विजेत्यालारोख दहा हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.उपविजेत्यास नऊ हजार रुपये व चषक आणि तृतीय क्रमांकास आठ हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले जाईल.चार ते दहा क्रमांकांना अनुक्रमे पुढील प्रमाणे बक्षीसे आहेत 4) रु.6000/- 5)रु.5000/- 6)रु.4000/- 7)रु.2400/- 8)रु.2000/- 9)रु.1800/- 10)रु.1800/- याशिवाय 7,9,11,13 व 15 वर्षाखालील मुलांना प्रत्येक गटात पाच चषक उत्तेजनार्थ म्हणून बक्षीस दिले जाणार आहे.अशी महिती भरत चौगुले व मनिष मारुलकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.फक्त महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील चार निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना आठशे रुपये प्रवेश फी आहे. त्या व्यतिरिक्त इतरांना पंधराशे रुपये प्रवेश फी ठेवली आहे.तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी आपली नावे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकेतस्थळावर https://mcachess.in/Tournament_Registration/Registration/registration_form.php ऑनलाईन पद्धतीने प्रवेश फी व फॉर्म भरून नोंदवावीत.या स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या गुणांकन स्पर्धा आहेत. त्यामुळे भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेची ऑनलाईन खेळाडू नोंदणी फी रु.250/- व फॉर्म भरून नोंदणीकृत होणे आवश्यक आहे.या महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेतून पहिल्या येणाऱ्या चार खेळाडूंची निवड 59 व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात होणार आहे. 59 वी राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा दिल्ली येथे दि. 22 डिसेंबर ते 3 जानेवारी 2023 दरम्यान होणार आहे. पत्रकार परिषदेस पंच आरती मोदी, धिरज वैद्य, अनिश गांधी, राजेंद्र मकोटे आदी उपस्थित होते.
Leave a Reply