
कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादावरून दोन्ही राज्यातून तीव्र प्रतिक्रिया दिली जात आहे. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सध्या परिस्थिती जरी नियंत्रणात आली असली तरी सीमा वाद अजून मिटलेला नाही. तरी देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री कणेरी मठावर येऊन तेथील प्रकल्पासाठी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा करतात आणि त्यांच्या उपस्थितीत कर्नाटकच्या साधुसंतांचा मेळावा मठावर घेण्यात येतो. त्यावेळी कर्नाटक सरकारने देशभर पसरलेल्या कन्नड बांधवांसाठी कर्नाटक भवन कणेरी मठ येथे बांधले जाईल अशी घोषणा केली. कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळला जातो. त्या कर्नाटक राज्याचे कर्नाटक भवन महाराष्ट्राच्या कोल्हापुरात उभे करणे म्हणजे सीमा लढ्यामध्ये हुतात्मा झालेल्यांवर तो अन्याय आहे. व पन्नास वर्षे सीमा लढा लढणाऱ्या महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. कुठल्याही विधायक कामाला आमचा विरोध नाही. परंतु भवनास कर्नाटक भवन हे नाव कदापे चालणार नाही. महाराष्ट्रात कर्नाटक भवन होऊ देणार नाही. शिवसेना हा डाव हाणून पाडणार आहे. व ज्यांनी निमंत्रित केले आहे त्यांना जाब विचारणार आहे. तसेच जे महाराज आहे त्यांनी महाराजांसारखे रहावे. कर्नाटक नाव खपवून घेतला जाणार नाही, असा तीव्र इशारा शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कर्नाटका सादरी करू दिली जात नाही. कर्नाटकमध्ये महाराष्ट्र भवन व्हावे अशी देखील मागणी यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली.
Leave a Reply